Shivner Times News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • आंबेगाव
    • जुन्नर
    • बारामती
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • योजना
    • नोकरी
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • आंबेगाव
    • जुन्नर
    • बारामती
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • योजना
    • नोकरी
No Result
View All Result
Shivner Times News
No Result
View All Result

शिवाजीनगर आणि स्वारगेट बस डेपो,मेट्रो स्थानकाचा विकास: १ मे २०२५ रोजी भूमीपूजनाची तयारी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश; शिवाजीनगर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी ६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

team shivner times by team shivner times
फेब्रुवारी 13, 2025
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र, राजकीय
शिवाजीनगर आणि स्वारगेट बस डेपो,मेट्रो स्थानकाचा विकास: १ मे २०२५ रोजी भूमीपूजनाची तयारी
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

शिवाजीनगर आणि स्वारगेट बस डेपो, मेट्रो स्थानकाचा विकास: १ मे २०२५ रोजी भूमीपूजनाची तयारी

पुणे: शिवाजीनगर आणि स्वारगेट येथील एसटी बसस्थानकाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, १ मे २०२५ रोजी या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते सांमजस्य करार तातडीने पूर्ण करावेत, असेही त्यांनी सांगितले. ही माहिती राज्याच्या परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

Advertisements
Ad 22

शिवाजीनगर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचा निर्णय पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी महामेट्रो आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समन्वयाने काम करावे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Advertisements
Ad 21

बुधवारी झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
बुधवारी (दि. १२) मुंबई येथे झालेल्या आढावा बैठकीत या प्रकल्पाची चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर तसेच राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर उपस्थित होते.

Advertisements
Ad 23

हे देखील वाचा: खेड बाजार समितीचे संचालक सयाजी मोहिते यांचा हमाल परवाना रद्द

माधुरी मिसाळ यांनी नुकताच परिवहन राज्यमंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर शिवाजीनगर आणि स्वारगेट बसस्थानकाच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी सांगितले, “शिवाजीनगर बसस्थानकाच्या धर्तीवर स्वारगेट येथील बसस्थानक आणि मेट्रो स्थानक विकसित करण्याबाबत सूचना केल्या आहेत. येत्या आठ दिवसात प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.”

Advertisements
Ad 24

शिवाजीनगर बसस्थानकाचा इतिहास
शिवाजीनगर बसस्थानक २०१९ मध्ये वाकडेवाडी येथे स्थलांतरित झाले. मात्र, मागील पाच वर्षांत जुन्या स्थानकाच्या विकासावर केवळ चर्चाच सुरू आहे. प्रत्येक वेळी बसस्थानकाच्या विकासाचे भिजत घोंगडे बाहेर काढायचे, बैठका आणि चर्चा करायची, प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना द्यायच्या. मात्र, अंमलबजावणीच्या अभावी ही दोन्ही बसस्थानके विकासापासून वंचित राहिली आहेत.

Advertisements
Ad 25

स्वारगेट बसस्थानकाचा विकास
स्वारगेट येथील बसस्थानक आणि मेट्रो स्थानकाच्या विकासासाठीही योजना आखण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीत मोठा बदल घडवून आणता येईल.

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा आग्रह
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी शिवाजीनगर बसस्थानकाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन वेळोवेळी पाठपुरवठा केला आहे. त्यांनी सांगितले, “शिवाजीनगर येथे अत्याधुनिक एसटी बसस्थानकाचे भूमिपूजन मे २०२५ मध्ये होईल. त्याआधी मेट्रोच्या वरील बाजूस हे बसस्थानक उभारण्यासाठी एसटी महामंडळ आणि महामेट्रो यांच्यात येत्या आठवड्यात एमओयु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

या प्रकल्पांमुळे पुणे शहराच्या वाहतुकीत सुधारणा होऊन नागरिकांना सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Advertisements

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Tags: ajit pawarAjit Pawar instructionsAjit Pawar Pune transportMadhuri MisalMaharashtra infrastructure projectsMaharashtra newsMaharashtra TransportMaharashtra transport newsMetro Station DevelopmentPMPMLPublic Transport ProjectsPune MetroPune Metro StationPune metro station developmentPune metro station projectPune public transport upgradePune transport infrastructureShivajinagar Bus DepotShivajinagar bus depot developmentShivajinagar bus station redevelopmentShivajinagar MetroSwargate Bus DepotSwargate bus depot modernizationSwargate bus station PuneSwargate Metro
Previous Post

येरवडा-कात्रज भुयारी मार्गाचा प्रस्ताव तातडीने सादर करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

Next Post

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: 7/12 उताऱ्यात 11 मोठे बदल

Next Post
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: 7/12 उताऱ्यात 11 मोठे बदल

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: 7/12 उताऱ्यात 11 मोठे बदल

ताज्या बातम्या

Daily Horoscope Today Marathi

Daily Horoscope 21 February 2026: खर्च वाढ की धनलाभ? वाचा आजचे सविस्तर दैनिक राशिभविष्य

फेब्रुवारी 21, 2026
Baner Shivajinagar Flyover Update Pune

Baner Shivajinagar Flyover Update : ट्रॅफिकमधून मोठी सुटका! बाणेर रॅम्प ‘या’ आठवड्यात सुरू

फेब्रुवारी 11, 2026
Daily Horoscope Today Marathi

Daily Horoscope: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा? जाणून घ्या 12 राशींचे सविस्तर भविष्य

फेब्रुवारी 11, 2026
Baravi Exam 2026 Maharashtra

Baravi Exam 2026: बारावीची परीक्षा आजपासून; 271 भरारी पथके तैनात

फेब्रुवारी 10, 2026
Pune Election Results Indapur NCP Victory

Pune Election Results: इंदापुरात राष्ट्रवादीचा इतिहास; भाजप पूर्णपणे पराभूत

फेब्रुवारी 10, 2026
Pune Election Results Mulshi

Pune Election Results: मुळशीत राष्ट्रवादीचे वर्चस्व, भाजपचे खाते उघडले

फेब्रुवारी 10, 2026

कॅटेगरीज

  • आंबेगाव
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिडा
  • जुन्नर
  • टेक्नॉलॉजी
  • ताज्या बातम्या
  • देश
  • निधन वार्ता
  • नोकरी
  • पश्चिम महाराष्ट्र
  • पुणे
  • बारामती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • योजना
  • राजकीय
  • राशीभविष्य
  • शिरूर
Shivner Times News

मुख्य संपादक: प्रज्योत फुलसुंदर

+918698243535 / +919890118336
shivnertimesnews@gmail.com
info@shivnertimesnews.in

Shivner Times News
Pimpalwandi, Tal- Junnar, Dist- Pune 412412
3/6, Balewadi Rd, F-7, Sanskruti Homes CHS, near mamata chowk, Pune, Maharashtra 411045

Shivner Times News मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'Shivner Times News कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास Shivner Times News जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. " Shivner Times News " वर प्रसिद्ध झालेल्या बातम्या माध्यम प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून मिळणा-या व विविध स्त्रोतांद्वारे मिळणा-या माहितीवरून प्रसिद्ध केल्या जातात. (न्यायालयीन कामकाज जुन्नर न्यायकक्षेत.)

ट्रेंडिंग टॅग्स

Accident News ajit pawar Alephata bjp cricket news Crime News Daily Horoscope Devendra Fadnavis eknath shinde HMPV Virus junnar Junnar News Junnar taluka leapod news maharashtra Maharashtra crime news Maharashtra government Maharashtra news maharashtra police Maharashtra Politics Marathi News narayangaon Narayangaon news NCP Police Investigation political news prevent HMPV pune Pune crime pune crime news Pune District Pune district news Pune health news pune news Shivaji Maharaj Shivneri Fort Shivner Times News shocking incident sticky news women empowerment आजचे राशीभविष्य जुन्नर पुणे पुणे जिल्हा महाराष्ट्र
  • ABOUT US
  • CONTACT US
  • PRIVACY POLICY
  • Ownership & Funding Info
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal

© 2024. Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • आंबेगाव
    • जुन्नर
    • बारामती
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • योजना
    • नोकरी

© 2024. Powered by ContentOcean Infotech Private Limited.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा