WhatsApp वर येणार अनोखं फीचर: तुमचा आवाज ऐकला की लगेच देईल उत्तर!
नवी दिल्ली : सध्या WhatsApp, Meta (Facebook), X (Twitter), Instagram यांसारख्या सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. त्यात WhatsApp चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. OpenAI ने WhatsApp वर त्यांच्या ChatGPT चॅटबॉटसाठी एक नवीन अपडेट जारी केले आहे.
आता हा चॅटबॉट केवळ मेसेजच नाहीतर इमेज आणि व्हॉईस मेसेज (ऑडिओ फाईल्स) देखील समजू शकतो आणि त्याला उत्तरही देऊ शकतो. OpenAI ने डिसेंबर 2024 मध्ये Meta च्या इन्स्टंट मेसेजिंग ॲप WhatsApp वर ChatGPT चा व्हर्जन लाँच केला आहे. सुरुवातीला, हा चॅटबॉट केवळ मेसेज आधारित प्रश्नांची उत्तरे देत असे, परंतु आता त्यात नवीन फीचर देण्यात आले आहेत.
आता WhatsApp वर उपलब्ध असलेला ChatGPT चॅटबॉट युजर्संनी पाठवलेल्या इमेज आणि ऑडिओ फाईल्स समजू शकतो आणि त्यावर आधारित मजकुरात रिप्लाय अर्थात प्रतिसाद देऊ शकतो.
हे देखील वाचा: श्री विघ्नहर साखर कारखान्यावरील आंदोलन तात्पुरते स्थगित, चेअरमन सत्यशील शेरकर यांचे आश्वासन
WhatsApp वर ChatGPT कसे वापरावे?
1. ChatGPT चा अधिकृत क्रमांक +1-800-242-8478 तुमच्या फोनमध्ये सेव्ह करावा
2. यानंतर पुन्हा व्हॉट्सॲप ओपन करा आणि तुमच्या कॉन्टॅक्टवर जा आणि हा नंबर शोधा.
3. चॅट उघडा आणि मेसेज पाठवून संभाषण सुरू करा.
4. मेसेज व्यतिरिक्त, आपण इमेज पाठवून प्रश्न देखील विचारू शकता.
5. तुम्ही व्हॉईस मेसेज पाठवून देखील प्रश्न विचारू शकता आणि हा चॅटबॉट मजकूरात उत्तर तुम्हाला देऊ शकणार आहे.












