वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार किसन महाराज साखरे यांचे निधन
पुणे: प्रसिद्ध वरिष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. काल रात्री सुमारे १० वाजता चिंचवड येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शारीरिक अस्वस्थतेमुळे रुग्णालयात दाखल
गेल्या दोन दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडली होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच सोमवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातून सावरणे शक्य झाले नाही.
अंत्यसंस्कार आळंदी येथे
➡️ मंगळवार (२१ जानेवारी) दुपारी ४ वाजता आळंदी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
➡️ संपूर्ण वारकरी संप्रदायात शोककळा पसरली असून, त्यांच्या जाण्याने अध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
हे देखील वाचा: अविवाहित असल्याचा फसवणूक प्रकार उघड; डॉक्टर तरुणीची आत्महत्या
किसन महाराज साखरे यांच्या निधनाने वारकरी संप्रदायासह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अध्यात्मिक आणि कीर्तन परंपरेतील योगदानाला सदैव स्मरणात ठेवले जाईल.












