मुंबई ओपन कराटे चॅम्पियनशिपमध्ये व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलचा राज्यस्तरीय विजय!; विद्यार्थ्यांचा उत्कृष्ठ पराक्रम; सुवर्णपदकांनी शाळेचा नावलौकिक वाढवला
मुंबई: विशाल जुन्नर सेवा मंडळ संचालित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मुंबई ओपन कराटे चॅम्पियनशिप 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचे आणि संपूर्ण समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
सुवर्णपदक विजेते विद्यार्थी:
आरोही रोहित काकडे (वय 10, इयत्ता 5वी) – सुवर्णपदक
आर्यन प्रवीण कालेकर (वय 9, इयत्ता 3री) – सुवर्णपदक
शौर्य किशोर काकडे (वय 10, इयत्ता 5वी) – सुवर्णपदक
प्रशिक्षण, मेहनत आणि कुटुंबाचा पाठिंबा यशाची गुरुकिल्ली
विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत, उत्कृष्ट शिस्त, एकाग्रता आणि दृढनिश्चयाच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी केली. शाळेचे कराटे प्रशिक्षक महेंद्र गुळवे यांचे मार्गदर्शन आणि पालकांचा मोलाचा पाठिंबा विद्यार्थ्यांच्या यशामागील प्रमुख घटक ठरले.
हे देखील वाचा: ज्ञानमंदिरमध्ये ‘कॉपीमुक्त अभियान’ अंतर्गत जनजागृती सप्ताहाचे आयोजन
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांचा गौरव
शाळे मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करत त्यांचे मनोबल वाढवले. विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे आणि शाळेचे सीईओ दुष्यंत गायकवाड यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या लौकिकात भर
या उज्ज्वल विजयामुळे व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलचा राज्यस्तरीय स्तरावर सन्मान वाढला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी संपूर्ण शाळेसाठी अभिमानाची गोष्ट घडवली असून त्यांचा प्रवास इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.












