टीम इंडियाच्या पोरी जगात भारी! U19 महिला विश्वचषकावर दुसऱ्यांदा मोहोर
मुंबई: भारतीय महिला U19 क्रिकेट संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत U19 T20 विश्वचषक 2025 चे विजेतेपद पटकावले! रविवारी (2 फेब्रुवारी) झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 9 गड्यांनी धुव्वा उडवत सलग दुसऱ्यांदा हे प्रतिष्ठित विजेतेपद पटकावले.
भारतीय संघाचा एकतर्फी विजय
द. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांसमोर गडगडत 82 धावांत ऑलआउट झाले. भारताने हे लक्ष्य सहज पार करत 11.2 षटकांत 1 गडी गमावून ऐतिहासिक विजय मिळवला.
गोंगाडी त्रिशाची मॅचविनिंग कामगिरी
- त्रिशाने गोलंदाजीत 3 विकेट्स घेतल्या.
- फलंदाजीत 33 चेंडूत नाबाद 44 धावा करत संघाचा विजय सुकर केला.
- तिच्या अष्टपैलू खेळीमुळे तिला सामन्याची सर्वोत्तम खेळाडू घोषित करण्यात आले.
भारतीय गोलंदाजांची भेदक कामगिरी
द. आफ्रिकेच्या फलंदाजांना भारतीय फिरकीपटूंनी जखडून ठेवले.
- गोंगाडी त्रिशाने 3 बळी घेतले.
- वैष्णवी शर्मा, पारुनिका सिसोदिया आणि आयुषी शुक्लाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
- 9 पैकी 9 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या, हे भारतीय संघाच्या गोलंदाजीतील ताकदीचे द्योतक आहे.
हे देखील वाचा: वानखेडेवर अभिषेक शर्माचा तडाखा! भारताने इंग्लंडसमोर उभा केला 248 धावांचा डोंगर
भारतीय संघाची दमदार फलंदाजी
- सलामीवीर जी कमलिनी आणि गोंगाडी त्रिशाने 4.3 षटकांत 36 धावांची भागीदारी केली.
- कमलिनी 8 धावांवर बाद झाली, पण नंतर सानिका चालकेने त्रिशासोबत संघाला विजय मिळवून दिला.
- सानिका 26 धावा नाबाद राहिली, तर त्रिशाने आक्रमक खेळी करत सामना लवकर संपवला.
संघाची ऐतिहासिक विजयी मोहीम
भारतीय संघाने या स्पर्धेत सर्व 7 सामने जिंकत विजेतेपद मिळवले.
- विंडीजवर 9 गडी,
- मलेशियावर 10 गडी,
- श्रीलंकेवर 60 धावा,
- बांगलादेशवर 8 गडी,
- स्कॉटलंडवर 150 धावा,
- उपांत्य फेरीत इंग्लंडवर 9 गडी,
- अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेवर 9 गडीने विजय मिळवला.
टीम इंडियाच्या पोरींनी पुन्हा एकदा सिद्ध केले – आम्ही क्रिकेटच्या जगातही अव्वल आहोत!












