नाशिक: अमृतधाम लिंक रोडवर वरदविनायक गणपति मंदिराजवळ झालेल्या अपघातात, दोन भावांना मागून आलेल्या बाईकने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला आणि छोटा भाऊ किरकोळ जखमी झाला. हा अपघात बुधवारी रात्री ९ वाजता घडला. पंचवटी पोलिसांनी हिट अँड रनचा गुन्हा दाखल केला आहे.
ओम जाधव यांच्या तक्रारीनुसार, ओम आणि त्यांचे मोठे भाऊ वैभव विश्वनाथ जाधव रात्रीचे जेवण करून शतपावलीसाठी अमृतधाम चौकाकडे जात होते. तेव्हा मागून आलेल्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली, ज्यामुळे दोन्ही भाऊ जमिनीवर पडले आणि वैभव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मृत वैभव एका गॅरेजमध्ये काम करत होते. दुचाकीस्वार स्टंट करत होते आणि वाहनांच्या वेग मर्यादेचे पालन करत नव्हते. या रस्त्यावर जड वाहतूक असतानाही वाहतूक पोलिस आणि इतर पोलिस कर्मचारी दिसत नाहीत.













