श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिराचा वार्षिक उत्सव आणि तपपूर्ती निम्मित्त तीन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह
श्री संत शिरोमणी सावता महाराज मंडळ आणि पिंपळवंडीच्या सर्व ग्रामस्थ आयोजित केलेल्या श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिराचा वार्षिक उत्सव आणि तपपूर्ती समारोह मोठ्या आनंदाने साजरा केला जाणार आहे. हा तीन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह मंगळवार १७ डिसेंबर २०२४ पासून गुरुवारपर्यंत म्हणजेच १९ डिसेंबर २०२४ पर्यंत चालेल.

कार्यक्रमाची रूपरेषा:
पहिला दिवस (मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४):
- प्रतिमा मिरवणुक – सकाळी १० वाजता
- वीणा पूजन- सकाळी ११.३० वाजता
- गाथा भजन- दुपारी १२ वाजता
- हरिपाठ- संध्याकाळी ४.३० ते ५.३० वाजेपर्यंत
- हरिकीर्तन – संध्याकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत (ह.भ.प. दत्तात्रय महाराज चव्हाण)
- महाप्रसाद- रात्री ८ नंतर
दुसरा दिवस (बुधवार, १८ डिसेंबर, २०२४):
- काकडी भजन – सकाळी ४ वाजता
- गाथा भजन- दुपारी १२ वाजता
- हरिकीर्तन – दुपारी ३ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत (ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख)
- हरिपाठ- संध्याकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत
- महाप्रसाद – संध्याकाळी ६ नंतर
तिसरा दिवस (गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४):
- काकडी भजन – सकाळी ४ वाजता
- काल्याचे कीर्तन- सकाळी ११ वाजता (ह.भ.प. सुदाम महाराज बनकर)
सर्व भक्तांना विनंती आहे की त्यांनी या तीन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
आयोजक: श्री संत शिरोमणि सावता महाराज मंडळ आणि समस्त ग्रामस्थ पिंपळवंडी











