सोने खरेदी करताय? दुकानात जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की तपासा!
सध्या सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याचा दर ९०,००० रुपयांपर्यंत पोहोचला होता. मात्र, आता या दरात सतत चढ-उतार दिसत आहेत. अशा परिस्थितीत, आपण जेव्हा सोने खरेदी करतो, तेव्हा ते योग्य प्रतीचे आणि शुद्ध असावे, अशी आपली इच्छा असते. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
सोने खरेदी करताना खालील गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे:
- शुद्धता तपासा: जेव्हा तुम्ही सोने खरेदीसाठी दुकानात जाल, तेव्हा सर्वात आधी सोन्याची शुद्धता तपासा. २४ कॅरेट सोने १०० टक्के शुद्ध असते, पण ते अतिशय नरम असल्याने दागिने बनवण्यासाठी सहसा वापरले जात नाही. बहुतेक दागिने २२ कॅरेट किंवा त्याहून कमी शुद्धतेच्या सोन्यापासून बनवले जातात.
- BIS हॉलमार्क पाहा: सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी नेहमी BIS हॉलमार्क तपासा. हा हॉलमार्क सोने खरे असल्याचे प्रमाण देतो. सोने खरेदी करताना, BIS लोगो आणि उत्पादकाचा ट्रेडमार्क नक्की तपासा.
- वजन तपासा: सोन्याची किंमत नेहमी त्याच्या वजनानुसार ठरवली जाते. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करत असाल आणि त्यात कोणतेही अतिरिक्त दगड किंवा धातू जोडलेले असतील, तर त्याचे वजन सोन्याच्या वजनात मोजले जाणार नाही याची खात्री करा.
हे देखील वाचा: पुणेकरांना महागाईचा झटका! सीएनजी दरात पुन्हा वाढ; वाहनचालक त्रस्त
- मेकिंग शुल्क: डिझायनर दागिन्यांसाठी अतिरिक्त मेकिंग शुल्क लागू होऊ शकते. त्यामुळे दागिने निवडताना मेकिंग शुल्काची माहिती घेणे महत्त्वाचे आहे.
- ट्रेंडिंग डिझाइन: जेव्हा तुम्ही डिझाइनचा विचार करता, तेव्हा शक्यतोवर सध्याच्या ट्रेंडनुसार असलेले डिझाइन निवडावे, जेणेकरून ते फॅशनमध्ये राहील.
या साध्या गोष्टी लक्षात घेतल्यास, तुम्ही योग्य आणि शुद्ध सोने खरेदी करू शकता आणि संभाव्य फसवणूक टाळू शकता













