माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण नाही; पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
पुणे – राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे पुण्यातून अपहरण झाल्याचा खोटा फोन पोलिस कंट्रोल रुमला आला होता. पुणे विमानतळावरून ऋषीराज सावंत यांचे अपहरण करण्यात आल्याचा दावा करणारा एक निनावी कॉल पोलिसांना प्राप्त झाला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. मात्र, तानाजी सावंत यांच्या स्वीय सहायकांनी पोलिसांना स्पष्ट केले की, ऋषीराज सावंत हे फिरायला गेले होते आणि त्यांचे अपहरण झाल्याची माहिती चुकीची आहे.
संध्याकाळी पाच वाजता पोलिस कंट्रोल रुमला आलेल्या फोनमध्ये दावा करण्यात आला की, पुणे विमानतळावरून पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून ऋषीराज सावंत यांचे अपहरण करण्यात आले आहे. या कॉलनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आणि संबंधित भागात नाकेबंदी केली. पोलिस उपायुक्त स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेत होते.
हे देखील वाचा: मोठी बातमी! माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण; पुणे विमानतळावरून अपहरण, पोलिसांचा तपास सुरू
पोलिसांनी यावरून तपास सुरू केल्यानंतर, तानाजी सावंत यांच्या स्वीय सहायकांनी स्पष्ट केले की, ऋषीराज सावंत हे अपहरण झालेल्या स्थितीत नाहीत. ते केवळ फिरायला गेले होते. त्यामुळे या घटनेला खोटी माहिती दिल्याची शंका पोलिसांना आली आहे.
सध्या पुणे पोलिसांकडून या फेक कॉलबाबत तपास सुरू आहे. पुढील तपासाचे मार्ग आणि संबंधित आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अधिक तपास प्रक्रिया सुरू केली आहे.












