मोठी बातमी! माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण; पुणे विमानतळावरून अपहरण, पोलिसांचा तपास सुरू
पुणे: राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिकेश सावंत बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. पुणे विमानतळावरून तो बेपत्ता झाल्याची माहिती असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज (दि. १०) सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नऱ्हे परिसरातून सायंकाळी 4.57 वाजता स्विफ्ट गाडीतून त्यांचे अपहरण झाल्याची माहिती मिळत आहे.
पुण्यातील वर्दळीच्या ठिकाणाहून राज्याच्या माजी आरोग्य मंत्र्यांच्या मुलाचे अपहरण होणे ही बाब अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे. सिंहगड पोलिस स्टेशनच्या हद्दीत संबंधित घटना घडली आहे. स्विफ्ट गाडीतून आलेल्या चार लोकांनी तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे तपास सुरू केला आहे.
हे देखील वाचा: राजुरीत मोफत नेत्रतपासणी शिबीर आयोजित, १५० रुग्णांची तपासणी
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची मोहीम सुरू केली आहे. पुण्यातील वर्दळीच्या ठिकाणाहून राज्याच्या माजी आरोग्य मंत्र्यांच्या मुलाचे अपहरण होणे ही बाब अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे. घटना घडताच पुण्यातील सर्व पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, तातडीने तपासकार्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सिंहगड पोलीस स्टेशनचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि लवकरात लवकर ऋषिकेश सावंत यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या अपहरणप्रकरणी कोणतीही माहिती असलेल्या नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.












