खामगाव, मावळ: ‘आजची बचत म्हणजेच उद्याची समृद्धी असते.’ याच महत्त्वपूर्ण संकल्पनेला विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच समजावे आणि आपल्या पुष्कळशा पैशांचा उपयोग कसा करावा, याची जाणीव व्हावी, तसेच बँकेतिल व्यवहार कशा पद्धतीने चालतात, हे शिकण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामगाव मावळ येथे ‘विद्यार्थी बचत बँक खामगाव मावळ’ या नविन्यपूर्ण योजनेची सुरुवात करण्यात आली.
बँकेत पैसे भरण्याची आणि काढण्याची पद्धत काय असते, बँकेचे पासबुक कसे असते, चेक कसा भरायचा, या आर्थिक व्यवहाराशी संबंधित कित्येक गोष्टी शिकण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. यामुळे भविष्यात कोणत्याही अडचणींचा सामना करण्यास विद्यार्थी तयार होतील. खऱ्या बँकेत असलेल्या स्लीप, पासबुक इत्यादींचा वापर करून आमची छात्र बचत बँक सुरू झाली.

पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमधून निवडलेले कॅशियर आणि क्लार्क यांना त्यांच्या कामाचे प्रशिक्षण देण्यात आले. बँकेचे कार्य विद्यार्थ्यांनीच चालवायचे असून, त्यांनी बचत केलेले पैसे शालेय वस्तू खरेदीसाठी काढता येतील. आवश्यक मदतीसाठी मार्गदर्शक शिक्षक हजर असतील.
विद्यार्थ्यांना भविष्यातील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्यांचे शालेय जीवनातच ट्रेनिंग मिळाले तर ते उद्याचे सुजाण आणि जबाबदार नागरिक बनतील, याची खात्री आहे. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. उमेध धावारे, श्रीमती वैशाली कुंभार मॅडम आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











