किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांवर मधमाशांचा हल्ला; 10 ते 15 जण जखमी
नारायणगाव: किल्ले शिवनेरीवर शिव जन्मस्थळाजवळ रविवार १७ फेब्रुवारी रोजी शिवभक्तांवर मधमाशांचा हल्ला झाला. या हल्ल्यात 10 ते 15 शिवभक्त जखमी झाले आहेत. जखमींना त्वरित जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटना घडताच आरोग्य पथक त्वरित घटनास्थळी पोहोचले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शिवजन्मोत्सव कार्यक्रम संपवून निघून गेल्यानंतर एका तासात हत्ती हौदाजवळ मोहळाच्या माशांचा अचानक फटका बसला. कडेलोटच्या दिशेने या माशांचा विस्फोट झाला, ज्यामुळे सर्व शिवभक्त सैरावैरा पळत सुटले.
हे देखील वाचा:पाचगणीच्या पठ्ठयाने ट्रॅफिक जाम मध्ये पॅराग्लायडिंग करून दिला पेपर
समुदाय आरोग्य अधिकारी श्रवण राऊत यांनी सांगितले की, या हल्ल्यामुळे पंधरा ते वीस लोक जखमी झाले आहेत. काही जणांनी कडेलोटच्या बाजूने खोडसाळपणे दगड फेकल्यामुळे माशांचा हल्ला झाल्याची शंका आहे. मधमाशांच्या हल्ल्यामुळे आरोग्य पथकालाही इजा झाली.
जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने शिवभक्तांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी, आरोग्य पथकाच्या तत्परतेमुळे आक्रमणाला नियंत्रित करण्यात मदत झाली.












