श्री छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त वाहतुकीत बदल
यवत: पुणे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरूर तालुक्यातील वढू बु येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी वाहतूक बदल करण्यात आला आहे पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत
28 मार्च रात्री दहा वाजल्यापासून ते एकोणतीस मार्च सकाळी दहा वाजेपर्यंत जड वाहतूक आणि मालवाहतूक वाहनांसाठी मार्ग बदलण्यात आला आहे तसेच शंभू भक्तांची वाहने निश्चित स्टॉपेज पॉईंटच्या पुढे नेण्यास मनाई करण्यात आली आहे
कोणत्या मार्गांवर बदल लागू होणार
- कोरेगाव भीमा बाजूकडून येणारी जड वाहतूक कोरेगाव भीमा सणसवाडी शिक्रापूर गॅस फाटा वाजेवाडी चौफुला चाकण पाबळ मार्गे जाईल
- चाकण आणि पाबळ बाजूकडून येणारी जड वाहतूक वाजेवाडी चौफुला गॅस फाटा शिक्रापूर सणसवाडी कोरेगाव भीमा मार्गे पुण्याकडे वळवण्यात येईल
- शंभू भक्तांची वाहने कोरेगाव भीमा वढू मार्गावरील माहेर संस्थेजवळ स्टॉपेज पॉईंटच्या पुढे जाण्यास बंदी असेल
- वाहतूक पोलिस आणि प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून कोणत्याही प्रकारच्या अडथळ्याशिवाय कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी नियोजन करण्यात आले आहे
हे देखील वाचा: नारायणगावातील अष्टविनायक कलेक्शन कापड दुकान शॉर्टसर्किटमुळे भस्मसात, दोन कोटींचं नुकसान
प्रशासनाचे निर्देश आणि नागरिकांची प्रतिक्रिया
- पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की पुण्यतिथी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नियमन काटेकोरपणे पाळावे.
- शंभू भक्तांनी निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचना पाळाव्यात आणि अधिकृत मार्गांचा वापर करावा.
- वाहतूक पोलिस तैनात असणार असून नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे.
- स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे प्रवाशांनी आपल्या मार्गाचा योग्य नियोजन करून प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त प्रवास करणाऱ्या भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आपल्या प्रवासाचा योग्य नियोजन करावे अधिक माहितीसाठी अधिकृत वाहतूक विभागाच्या सूचनांकडे लक्ष द्या













