सैफ अली खानवर चाकूने हल्ला; घरात घुसून 6 वेळा वार; लीलावती रुग्णालयात दाखल
मुंबई: बॉलिवूड जगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता सैफ अली खानवर एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला आहे. या घटनेने खूपच खळबळ उडाली आहे. हल्ल्यानंतर सैफला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हा हल्ला का झाला आणि यामागे काय कारण होते? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे आणि हल्लेखोराचा शोध घेत आहेत. रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे की सैफ अली खानची स्थिती सध्या स्थिर आहे.














