अवकाळी पावसाने आंबा शेतकऱ्यांचे नुकसान; रायगडमध्ये शेतकरी चिंतेत, सरकारकडे मदतीची मागणी
रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहेत. अवकाळी पावसामुळे आंबा फळ आणि आंबा पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने याकडे वेळेत लक्ष द्यावे आणि शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी आंबा बागायतदार करत आहेत.
पावसामुळे आंब्याला आलेला मोहर काळा पडत आहे आणि गळून जात आहे. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी, तसेच रायगड आणि श्रीवर्धन मधील मुख्यतः आंबा बागायतदार शेतकरी सध्या संकटात आहेत. साधारण वर्षभर फक्त या आंब्यावर अवलंबून असतात आणि ऑक्टोबरपासून खरी मशागत सुरू होते. त्याला फवारणी आणि कीटकनाशकांचा वापर केला जातो.
हे देखील वाचा: फेसाळलेली इंद्रायणी नदी: आळंदीतील आरोग्याची समस्या
काल रात्री अचानक पावसामुळे आंब्याला आलेले मोहर गळून पडणार आहेत. त्यामुळे बरेच आंबे कैरी धरण्याच्या स्वरूपात नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे मोठे नुकसान होणार आहे आणि दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. शासनाने त्वरित लक्ष द्यावे आणि शेतकऱ्यांचे हाल दूर करावेत, हीच विनंती आहे.
आज सकाळी जोरदार पावसामुळे झाडांचा मोर संपूर्णपणे नष्ट होऊन काळा पडला आहे. ऑक्टोबरपासून केलेल्या दोन-तीन फवारण्या आणि झाडांची जोपासना व्यर्थ ठरली आहे. मोर आल्यावर त्याला किडी मुंगी जाण्यासाठी केलेली फवारणीही निष्फळ ठरली आहे. त्यामुळे फल येण्याची शक्यता नाही. सरकारने काहीतरी उपाय करावा, अशी अपेक्षा आंबा बागायतदार करत आहेत.












