स्वारगेट बलात्कार प्रकरणात मोठा अपडेट, पीडितेच्या मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती
पुणे शहरातील स्वारगेट बस डेपोत मंगळवारी (१६ फेब्रुवारी) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर पुणे शहरासह राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. स्वारगेट बस डेपोवर झालेल्या या धक्कादायक घटनेवर सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमठत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय गाडे (वय ३६) या संशयित आरोपीने या तरुणीवर बलात्कार केला आहे. त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी आठ पथके रवाना केली आहेत. त्याचबरोबर पीडितेचा मेडिकल रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. रिपोर्टनुसार, आरोपीने एकदा नाही तर दोन वेळा बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
ससून रुग्णालयाच्या मेडिकल रिपोर्टमध्ये या घटनेचा तपशील दिला असून, तो पोलिसांना बुधवारी प्राप्त झाला. पीडित तरुणीने मंगळवारी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ ही घटना गांभीर्याने घेत आरोपीच्या शोधासाठी पथके पाठवली.
हे देखील वाचा: रोटरी क्लब च्या माध्यमातून इंदिरानगर जिल्हा परिषद शाळेला दोन संगणक भेट
सुरक्षा यंत्रणेची गडबड:
या अत्याचाराची घटना स्वारगेट पोलीस स्थानकापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या एसटी डेपोत घडल्यामुळे, परिसरातील सुरक्षा व्यवस्था संदेहास्पद ठरली आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा केवळ नावापुरतीच असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
स्वारगेट आगारातील सुरक्षा व्यवस्थेवर कारवाई करण्यात आली असून, आतापर्यंत २४ सुरक्षा रक्षकांवर निलंबनाची कारवाई केली गेली आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, गुरूवारी एसटी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
पुण्यात वाढत असलेल्या गुन्ह्यांची चिंता:
याशिवाय, गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात गुंडांची दहशत, चोरी, खून आणि बलात्कार यासारख्या गंभीर घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे शहरवासीयांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांच्या तपासानंतर या घटनेचा शोध घेण्यात येईल आणि आरोपीला कडक शिक्षा देण्यात येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.












