पुणेकरांवर महागाईचा तडाखा: CNG दर पुन्हा वाढले; महागाईने पुन्हा दिली पुणेकरांना झळ
पुणे: पुणेकरांच्या खर्चात आणखी वाढ होणार आहे. कारण सीएनजीच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. महाराष्ट्र नेचुरल गॅस लिमिटेड (MNGL) ने २०२४ मध्ये चौथ्यांदा सीएनजी दरात १.१० रुपये प्रति किलोग्रॅम वाढ केली आहे.
सीएनजीची नवीन किंमत आता प्रति किलोग्रॅम ८९ रुपये असेल. पूर्वी सीएनजी दर प्रति किलो ८७.९० रुपये होता. आता पुणे, पिंपरी-चिंचवड आणि इतर जिल्ह्यांमध्ये सीएनजीचे नवीन दर प्रति किलोग्रॅम ८९ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
हे देखील वाचा: दहावीच्या विद्यार्थ्यांवर शिक्षिकेचा बलात्कार
या वाढीमुळे सीएनजीच्या किमती डिझेलच्या किमतीपेक्षा २० टक्के आणि पेट्रोलच्या किमतीपेक्षा ४० टक्के कमी झाल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारातील चढ-उतारांमुळे सीएनजीच्या किमती वाढल्या आहेत, ज्यामुळे शहरातील जवळपास सर्व रिक्शाचा खर्च वाढला आहे.












