चि. संस्कार नामदेव सोनवणे याची Maharashtra Cricket Association (U 16)मध्ये निवड झाली असून सुरत (गुजरात)मध्ये होणाऱ्या Vijay Marchant Trophy या राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धेसाठी MCA च्या संघात त्याची निवड झालेली आहे.
संस्कारच्या अद्वितिय यशामागे त्याचे अथक परीश्रम, जिद्द,चिकाटी,सातत्य आणि शिस्त हे गुण आहेत. संस्कारला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या विविध क्रिकेट प्रशिक्षकांच्या अनमोल मार्गदर्शनासोबतच आमचे बंधू श्री. नामदेव सोनवणे (मंडल अधिकारी) यांचा एक पालक म्हणून संस्कारला घडवण्यात सिंहाचा वाटा आहे. “संस्कारच्या यशाचा आपल्याला अभिमान असून तो भविष्यात क्रिकेटविश्वात आपला ठसा नक्की उमटवेल आणि चाळकवाडीचे,जुन्नर तालुक्याचे नाव आणखी एका उंचीवर नेईल !” अशा शब्दांत किल्ले शिवनेरीचे शिलेदार, जुन्नर तालुक्याचे आमदार श्री.शरददादा सोनवणे यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या.














