नेतवड गावाचे माजी उपसरपंच आणि सामाजिक कार्यांमध्ये नेहमीच अग्रणी असलेले श्री शांताराम मानाजी बटवाल यांच्या आई श्रीमती जीजाबाई मानाजी बटवाल यांच्या ९५व्या वाढदिवसानिमित्त मोफत महा आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. डिसेंट फाउंडेशनच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी ऑडिटोरियम, नेतवड माळवाडी तालुका जुन्नर येथे आज, शनिवार, ७ डिसेंबर २०२४ रोजी हा कार्यक्रम झाला.
या शिबिरात श्री हॉस्पिटलच्या माध्यमातून महिलांची कॅन्सर, हृदय रोगांची पूर्व तपासणी करण्यात आली तसेच मूत्ररोग, स्त्रीरोग, त्वचारोग आणि विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या. या प्रसंगी ९५ ज्येष्ठ नागरिकांना आधार स्टिकचे वितरण करण्यात आले.
या वेळी माजी आमदार बाळासाहेब दांगट , निवृत्त तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्याम बनकर , डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, सचिव डॉ. एफ बी आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, डॉक्टर अमेया डोके, डॉक्टर प्रकाश टाले, डॉक्टर अवधूत वलवणकर, डॉक्टर अदिती वलवणकर, डॉक्टर राजश्री पाचेगावकर, संतोष शिंदे, प्राचार्य एकनाथ डोंगरे, चेत्राली शेळके, सपना बेलवटे, नंदाताई बनकर, शांताराम बटवाल, पोलीस पाटील विलास तुकाराम तमाणे, सयाजी भगत बटवाल, सरपंच उपसरपंच विशाल बनकर, गणेश बटवाल, माऊली बटवाल, खंडूशेठ बटवाल, आशा सेविका आणि इतर मान्यवर उपस्थित होते.












