नारायणगावात “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार २०२५” वितरण सोहळा उत्साहात पार पडला
जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाने आयोजित केलेल्या “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार २०२५” वितरण सोहळ्याचा आयोजन नारायणगाव ता. जुन्नर येथील कलासागर गार्डन मंगल कार्यालयात अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी, जुन्नर तालुका आमदार शरददादा सोनवणे यांनी आपल्या मनोगतात शैक्षणिक क्षेत्रातील जुन्नर तालुक्याचा उल्लेख करत, येथील शिक्षकांची मेहनत आणि त्यांचे कार्य प्रशंसेस पात्र असल्याचे सांगितले. त्यांच्याच शब्दात, “नाणेघाटात मराठीचा पहिला लेख सापडला आहे, त्यामुळे जुन्नर तालुक्यातील शिक्षक निश्चितच या अभिमानाचा शुद्धतेने संरक्षण करतील.”
उद्घाटन सोहळ्यात विविध क्षेत्रांतील १३ शाळांना व ७३ शिक्षकांना फेटा, शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले.
महत्वाच्या मान्यवरांचा कार्यक्रमात सहभाग
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद पुणेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे होते. ते म्हणाले, “ग्रामीण भागातील शाळांचे शिक्षक केवळ शिक्षणच देत नाहीत, तर त्यांच्या कार्यामुळे शाळा टिकून राहतात. शिक्षकांच्या विविध समस्यांबाबत आम्ही पुढाकार घेऊन काम करू.”
कार्यक्रमाच्या निमित्ताने जि.प.माजी उपाध्यक्ष शरदराव लेंडे,विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर,तालुका शिवसेना प्रमुख माऊली खंडागळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार,शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख मंगेश मेहेर,जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे,तालुका संघाचे अध्यक्ष रमाकांत कवडे,कार्याध्यक्ष वैभव सदाकाळ,पुरस्कारार्थी रेश्मा पानसरे,राजेंद्र फापाळे यांनी मनोगत व्यक्त करून शिक्षक संघाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
सहभागी असलेल्या इतर मान्यवरांनी शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल शिक्षक संघाच्या उपक्रमांचे कौतुक केले. यामध्ये शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष विनायक ढोले,साहेबराव मांडवे,जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सुशीला डुंबरे,विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे,अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कानडे,मनिषा कानडे, संघाचे तालुका अध्यक्ष रमाकांत कवडे,माजी अध्यक्ष रविंद्र वाजगे,उपेंद्र डुंबरे,विकास मटाले,नेते विश्वनाथ नलावडे,
हे देखील वाचा: बिबट्या हल्ला: युवकाची 10 मिनिटे जीवघेणी झुंज, आई आणि पत्नीची सूटका
सभापती अनिल कुटे,उपसभापती सुनिता वामन,अंबादास वामन, सविता कुऱ्हाडे,तालुका शिक्षक पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ,कोषाध्यक्ष अशोक बांगर, संदिप शिंदे,दिपक मुंढे,राजेंद्र चिलप,पंडित चौगुले,महिला आघाडी अध्यक्षा शुभदा गाढवे,कोषाध्यक्ष मनिषा डोंगरे,सरचिटणीस वैशाली कुऱ्हाडे,विभागप्रमुख अलका घोलप,सुनिता औटी,हेमलता राजगुरू,विजय नवले,शांताराम डोंगरे,मारूती निर्मळ,बाळू कडू, सुरेश गडगे,शरयू टोयोटा मंचर व्यवस्थापक आनंद आंधळे,पटवर्धन सर,बाळासाहेब, गिलबिले,सुनिल हाडवळे आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या विशेष आकर्षणात सत्यशोधक महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा रवींद्र पानसरे आणि रेश्मा पानसरे यांनी केली. तसेच, “ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठान” आणि “शिक्षक संघ” यांच्या सदस्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.
शिक्षक संघाची व लोकसहभागाची महत्त्वपूर्ण भूमिका
हा कार्यक्रम एकत्रितपणे ज्या शिक्षक संघ आणि स्थानिक लोकांच्या सहभागाने यशस्वी झाला, त्यात सर्व प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष रमाकांत कवडे, कार्याध्यक्ष वैभव सदाकाळ, आणि सरचिटणीस प्रभाकर दिघे यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. सर्व शिक्षक, ग्रामस्थ, आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी, कार्यक्रमाची सूत्रसंचालन प्रभाकर दिघे आणि उज्वला लोहकरे यांनी केली, तर आभार दत्तात्रय हांडे यांनी मानले.












