मुरबाड – कल्याण मार्गावर ५८ अपघातांचे वर्ष;३६ मृत्यू, ५८ जखमी
मुरबाड: मुरबाड – कल्याण नगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर म्हारळ ते माळशेज घाट या महामार्गावर गेल्या वर्षी विविध प्रकारचे अपघात झाले आहेत, ज्यात ३६ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ५८ जण गंभीर जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग पोलिस केंद्र मुरबाड- माळशेज घाट सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल विस्पुते यांनी दिली.
हे देखील वाचा: महाराष्ट्राची मागणी यशस्वी: मनुका जीएसटी मुक्त
घटनेची माहिती मिळताच मुरबाड-माळशेज हायवे सेंटरचे पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अपघाताची माहिती घेतली आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र ठाकूर, चंद्रकांत भोये, पोलीस हवालदार राजेंद्र रसाळ, संजय घुडे, प्रवीण गायकवाड, तसेच पोलिसशिपाई मध्ये कैलास कोकाटे, खंडेराव आव्हाड, शरद पाखरे, पोलिस हवालदार अमोल पाटील आणि इतर पोलिस अंमलदार जागोजागी म्हारळ ते माळशेज घाट पर्यंत सतर्क आहेत. तसेच मुरबाड माळशेज घाट पोलिसांनी जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ दरम्यान घडलेल्या अपघातांची माहिती दिली आहे.
वर्ष २०२४-मध्ये एकूण ५८ अपघात
एकूण मृत्यू- ३६, एकूण जखमी-. ५८
म्हारळ ते माळशेज घाट पर्यंत रस्त्यावर अपघातग्रस्तांना मदत करण्यात वाहतूक पोलिस चांगली भूमिका बजावत आहेत आणि घाट रस्त्याच्या काठच्या गावांतील लोकही मृत्युंजय देवता म्हणून काम करत आहेत.
-अनिल विस्पुते
सहाय्यक पोलिस निरीक्षक
राष्ट्रीय महामार्ग पोलिस केंद्र
माळशेज घाट मुरबाड जिल्हा ठाणे












