गुणवंत शिक्षक पुरस्कार माया माळवे यांना घोषित; श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूलच्या शिक्षिकेचा सन्मान
रानमळा: श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल रानमळा (जुन्नर) येथील शिक्षिका माया राजकुमार माळवे यांना वर्ष 2024-25 जुन्नर तालुका स्तरावर “गुणवंत शिक्षक पुरस्कार” देण्याची घोषणा जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षक संघाने केली आहे.आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते दि.१२ जानेवारी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षक संघ, जुन्नर तालुका शिक्षक लोकशाही आघाडी, जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षिका संघ, जुन्नर तालुका सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. पुरस्कार प्राप्त शिक्षिका माया माळवे 31 वर्षांपासून रानमळामध्ये कार्यरत आहेत. त्या विद्यार्थ्यांसाठी अनेक विविध उपक्रम राबवतात.
हे देखील वाचा: कुरवलीत माती दिनानिमित्त डॉ. मेटकरी – खरात यांचे मार्गदर्शन
पुरस्काराच्या घोषणेसाठी प्राचार्य सुदाम जगताप, जयश्री थोरात, रमेश मालुंजकर, संतोष कर्डक,विद्या औटी आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी माया माळवे यांचा शाल, श्रीफळ आणि फुलांच्या गुच्छाने सत्कार केला. तसेच माया माळवे यांचे गावच्या सरपंच सविता तिकोने, आणि सर्व ग्रामस्थ यांनी कौतुक केले आहे.











