क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९८ वी जयंती पिंपळवंडीत उत्साहात संपन्न!
पिंपळवंडी (ता. जुन्नर, जि. पुणे), दि. १२: क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९८ वी जयंती पिंपळवंडी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तालुका जुन्नरमधील पिंपळवंडी गावातील संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मंदिरात आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
या विशेष कार्यक्रमाला पिंपळवंडी गावच्या सरपंच मेघाताई काकडे, सदस्य सचिन ठाणेकर, माजी सरपंच विमलताई, माजी ग्रामपंचायत सदस्य सत्यवान काकडे, माजी पंचायत समिती सदस्य श्यामराव माळी, फुलसुंदर, सावता महाराज मित्र मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी दशरथ दादा फुलसुंदर, संजयभाऊ साहेब फुलसुंदर, शैलेश बाबा फुलसुंदर, संतोष नाना फुलसुंदर, नयन फुलसुंदर, लक्ष्मण फुलसुंदर, दिपक दादा डोंगरे, मंदाताई खराडे
यांच्यासह बसपाचे पुणे जिल्हा प्रभारी श्रीकांत कसबे, तालुका अध्यक्ष अनिल रोकडे, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष गणेश वाव्हळ, सामाजिक कार्यकर्ते सतिष भाई कसबे, भारतीय बौद्ध महासभा तालुका महिला अध्यक्षा पूनमताई दुधवडे, वंचित पुणे जिल्हा पदाधिकारी अरविंद पंडित, एकता पंडित, गौतम करंदीकर, अर्जुन सोनवणे आणि सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार सिद्धार्थ कसबे आदी मान्यवर उपस्थित होते.
हे देखील वाचा: पुणेकरांना महागाईचा झटका! सीएनजी दरात पुन्हा वाढ; वाहनचालक त्रस्त
यावेळी प्रा. गणेश रोकडे यांनी महात्मा फुले यांच्या विचारांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, महात्मा फुले यांनी बहुजन समाजासाठी ज्ञानाची कवाडे उघडली आणि ती आजही आपल्यासाठी उपलब्ध आहेत. विशेषतः मुलींनी पुढे येऊन उच्च शिक्षण घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
एकंदरीत, पिंपळवंडी येथे महात्मा फुले यांची जयंती मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरी करण्यात आली, ज्यात समाजातील विविध स्तरातील लोकांनी सहभाग घेतला.












