ओतूरमध्ये बिबट्याचा हल्ल्यात संतोष आणि योगिता गिते पती-पत्नी जखमी
ओतूर: येथे दुचाकीवर बाबीत माळा घराकडे जात असताना दुचाकीवर बसलेल्या पती-पत्नीवर दबाधरुन असलेल्या बिबट्याने हल्ला करुन जखमी केले. घटना शुक्रवार, 20 डिसेंबर रोजी ओतूर (जुन्नर) मध्ये बाबीत माळा रोड पिंपळगाव जोगा कालवा येथे घडली.
संतोष बन्सीधर गिते वय 46 वर्षे, योगिता संतोष गिते वय 39 वर्षे दोघे (ओतूर), बाबीत माळा, एक बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले. बिबट्या हल्ल्याबाबत ओतूरचे वधपरिक्षेत्राधिकारी यांनी सांगितले की, संतोष गिते आहेत आणि त्यांची पत्नी योगिता दुचाकीवर ओतूरहून बाबीत माळा घराकडे जात असताना, सायंकाळी सुमारे 7:30 वाजता पिंपळगाव जोगा कालवा येथे बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर हल्ला केला, ज्यामुळे पती-पत्नी दोघेही जखमी झाले.
हे देखील वाचा: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगचा शपथविधी सोहळा संपन्न
ओतूर वन विभागाला घटना कळताच, ओतूर वन विभाग अधिकारी लाहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली, वनपाल सारिका बुट्टे, वररक्षक विश्वनाथ बेले यांनी घटनास्थळी जाऊन संतोष गिते आणि योगिता गिते यांना ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
वैद्यकीय अधिकारी श्रीहरी सरोक्ते, डॉ. वैष्णवी ठिकेकर यांनी त्यांचा प्राथमिक उपचार केला. वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, पुढील उपचारासाठी त्यांना नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
डॉक्टरांनी सांगितले की, या हल्ल्यात बिबट्याने संतोष गिते यांच्या उजव्या मांडीवर आणि योगिता गिते यांच्या उजव्या हातावर पंजा मारला आहे.











