राहुल सोलापूरकर पुन्हा वादात; वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल
Shivner Times News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • आंबेगाव
    • जुन्नर
    • बारामती
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • योजना
    • नोकरी
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • आंबेगाव
    • जुन्नर
    • बारामती
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • योजना
    • नोकरी
No Result
View All Result
Shivner Times News
No Result
View All Result

राहुल सोलापूरकर पुन्हा वादात; वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल

team shivner times by team shivner times
फेब्रुवारी 10, 2025
in ताज्या बातम्या, पुणे, मनोरंजन, महाराष्ट्र, राजकीय
राहुल सोलापूरकर पुन्हा वादात; वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

राहुल सोलापूरकर पुन्हा वादात; वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल

पुणे: अभिनेते राहुल सोलापूरकर पुन्हा वादात आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांच्या घराबाहेरील बंदोबस्तात वाढ केली आहे.

Advertisements
Ad 22

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागितल्यानंतर नुकतेच ते प्रकरण थंड झाले होते. मात्र, रविवारी व्हायरल झालेल्या त्यांच्या नव्या व्हिडीओने ते पुन्हा अडचणीत आले आहेत.

Advertisements
Ad 21

छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची भूमिका करताना वेदांमध्ये चातुर्वर्ण्य वितरण कसे केले आहे, याविषयीची माहिती देताना सोलापूरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक देण्यात आले होते. परंतु, कर्मानुसार ते ब्रह्मण ठरतात, असे वक्तव्य केले होते. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर सर्व स्तरांतून नाराजी व्यक्त केली जात असून, अनेकांनी सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

Advertisements
Ad 23

सोलापूरकर यांच्याकडून जाहीर माफी:

Advertisements
Ad 24

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या वक्तव्याने व्यथित झालेल्या सर्वांची आपण जाहीर माफी मागत आहोत, अशा शब्दांत राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली आहे. त्यासंबंधी प्रसार माध्यमांकडे पाठविलेल्या चित्रफितीत बोलताना ते म्हणतात की, छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची भूमिका करताना एका प्रसंगात वेदांमधील एका वाक्यात चातुर्वर्ण्याचे वितरण कसे ठरते, याचे विश्लेषण केलेले आहे.

Advertisements
Ad 25

हे देखील वाचा: दिवंगत शिरीष महाराज मोरेंच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ३२ लाखांची मदत; आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर आर्थिक साहाय्य

व्यक्तीच्या कर्मानुसार ते ठरते, असा त्याचा अर्थ होतो. या भूमिकेतील नेमके हे वाक्य उचलून काही जण समाजाचे मन कलुषित करत आहेत. समाजात वावरत असताना गेली 40 वर्षे आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, स्वा. सावरकर आदी महामानवांपुढे नतमस्तक होऊन त्यांच्यावर व्याख्याने दिली आहेत. त्यांचा आदर्श समोर ठेवून जगत असलेली कोणतीही व्यक्ती त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करू शकत नाही. तरीही या वक्तव्याने कोणाची मने दुखावली गेली असल्यास पुन्हा एकदा जाहीर माफी मागतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पुण्यातील घराभोवती बंदोबस्त वाढवला:

छत्रपती शिवाजी महाराज आणि आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याने अभिनेते राहुल सोलापूरकर हे चांगलेच अडचणीत आले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कोथरूड येथील घराभोवती पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

पोलिसांनी त्यांच्या रक्षणार्थ सुमारे दहा अधिकारी आणि 15 ते 20 पोलिस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त लावला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात पोलिस आयुक्तांकडे तक्रारी आल्या होत्या. या वेळी आयुक्तांनी तक्रारीची शहानिशा करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले होते.

Advertisements

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Tags: Controversial VideoDr. Babasaheb AmbedkarDr. Babasaheb Ambedkar statementIndian actor controversypunepune newsRahul SolapurkarRahul Solapurkar controversyviral controversial videoViral Video
Previous Post

दिवंगत शिरीष महाराज मोरेंच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ३२ लाखांची मदत; आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर आर्थिक साहाय्य

Next Post

पुणे पोलिस भरती २०२५: ४५ विविध पदांसाठी कंत्राटी नियुक्ती प्रक्रिया सुरू

Next Post
पुणे पोलिस भरती २०२५: ४५ विविध पदांसाठी कंत्राटी नियुक्ती प्रक्रिया सुरू

पुणे पोलिस भरती २०२५: ४५ विविध पदांसाठी कंत्राटी नियुक्ती प्रक्रिया सुरू

ताज्या बातम्या

Daily Horoscope Today Marathi

Daily Horoscope 21 February 2026: खर्च वाढ की धनलाभ? वाचा आजचे सविस्तर दैनिक राशिभविष्य

फेब्रुवारी 21, 2026
Baner Shivajinagar Flyover Update Pune

Baner Shivajinagar Flyover Update : ट्रॅफिकमधून मोठी सुटका! बाणेर रॅम्प ‘या’ आठवड्यात सुरू

फेब्रुवारी 11, 2026
Daily Horoscope Today Marathi

Daily Horoscope: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा? जाणून घ्या 12 राशींचे सविस्तर भविष्य

फेब्रुवारी 11, 2026
Baravi Exam 2026 Maharashtra

Baravi Exam 2026: बारावीची परीक्षा आजपासून; 271 भरारी पथके तैनात

फेब्रुवारी 10, 2026
Pune Election Results Indapur NCP Victory

Pune Election Results: इंदापुरात राष्ट्रवादीचा इतिहास; भाजप पूर्णपणे पराभूत

फेब्रुवारी 10, 2026
Pune Election Results Mulshi

Pune Election Results: मुळशीत राष्ट्रवादीचे वर्चस्व, भाजपचे खाते उघडले

फेब्रुवारी 10, 2026

कॅटेगरीज

  • आंबेगाव
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिडा
  • जुन्नर
  • टेक्नॉलॉजी
  • ताज्या बातम्या
  • देश
  • निधन वार्ता
  • नोकरी
  • पश्चिम महाराष्ट्र
  • पुणे
  • बारामती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • योजना
  • राजकीय
  • राशीभविष्य
  • शिरूर
Shivner Times News

मुख्य संपादक: प्रज्योत फुलसुंदर

+918698243535 / +919890118336
shivnertimesnews@gmail.com
info@shivnertimesnews.in

Shivner Times News
Pimpalwandi, Tal- Junnar, Dist- Pune 412412
3/6, Balewadi Rd, F-7, Sanskruti Homes CHS, near mamata chowk, Pune, Maharashtra 411045

Shivner Times News मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'Shivner Times News कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास Shivner Times News जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. " Shivner Times News " वर प्रसिद्ध झालेल्या बातम्या माध्यम प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून मिळणा-या व विविध स्त्रोतांद्वारे मिळणा-या माहितीवरून प्रसिद्ध केल्या जातात. (न्यायालयीन कामकाज जुन्नर न्यायकक्षेत.)

ट्रेंडिंग टॅग्स

Accident News ajit pawar Alephata bjp cricket news Crime News Daily Horoscope Devendra Fadnavis eknath shinde HMPV Virus junnar Junnar News Junnar taluka leapod news maharashtra Maharashtra crime news Maharashtra government Maharashtra news maharashtra police Maharashtra Politics Marathi News narayangaon Narayangaon news NCP Police Investigation political news prevent HMPV pune Pune crime pune crime news Pune District Pune district news Pune health news pune news Shivaji Maharaj Shivneri Fort Shivner Times News shocking incident sticky news women empowerment आजचे राशीभविष्य जुन्नर पुणे पुणे जिल्हा महाराष्ट्र
  • ABOUT US
  • CONTACT US
  • PRIVACY POLICY
  • Ownership & Funding Info
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal

© 2024. Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • आंबेगाव
    • जुन्नर
    • बारामती
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • योजना
    • नोकरी

© 2024. Powered by ContentOcean Infotech Private Limited.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा