नारायणगावातील अष्टविनायक कलेक्शन कापड दुकान शॉर्टसर्किटमुळे भस्मसात, दोन कोटींचं नुकसान
Shivner Times News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • आंबेगाव
    • जुन्नर
    • बारामती
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • योजना
    • नोकरी
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • आंबेगाव
    • जुन्नर
    • बारामती
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • योजना
    • नोकरी
No Result
View All Result
Shivner Times News
No Result
View All Result

नारायणगावातील अष्टविनायक कलेक्शन कापड दुकान शॉर्टसर्किटमुळे भस्मसात, दोन कोटींचं नुकसान

धवल सुरेश चव्हाण यांच्या कापड दुकानात भीषण आग, शेजारील वर्‍हाडी मेडिकलचे नुकसान; स्थानिक अग्निशमन यंत्रणा अपुरी

team shivner times by team shivner times
मार्च 19, 2025
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
नारायणगावातील अष्टविनायक कलेक्शन कापड दुकान शॉर्टसर्किटमुळे भस्मसात, दोन कोटींचं नुकसान

नारायणगावातील अष्टविनायक कलेक्शन कापड दुकान शॉर्टसर्किटमुळे भस्मसात, दोन कोटींचं नुकसान

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

नारायणगावातील अष्टविनायक कलेक्शन कापड दुकान शॉर्टसर्किटमुळे भस्मसात, दोन कोटींचं नुकसान

नारायणगाव :  जुन्नर तालुक्यातील नारायणगावातील येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या धवल सुरेश चव्हाण यांच्या मालकीच्या अष्टविनायक कलेक्शन रेडीमेड कापडाच्या तीन मजली दुकानाला शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागल्याने दोन ते अडीच कोटींचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी (दि. 18) पहाटे चार वाजेच्या सुमारास वरच्या मजल्यावरून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले. त्यानंतर दुकानाला लागलेल्या अगीने रौद्ररूप धारण केले होते.

Advertisements
Ad 22

दुकानाला आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामपंचायतीच्या ट्रॅक्टरला जोडलेल्या अग्निशमन बंबाच्या माध्यमातून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु दुकानाला लागलेली आग भीषण असल्याने जुन्नरवरून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत कापड दुकानाला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले होते. दरम्यान राजगुरूनगर, विघ्नहर सहकारी साखर कारखाना व कांदळी येथील औद्योगिक वसाहतीतील अग्निशामन बंब व जुन्नर नगरपरिषदेचा अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले.

Advertisements
Ad 21

कापडाच्या दुकानाला लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार आपल्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांना मदत केली. पहाटे दुकानाला लागलेली आग सहा तासांच्या कालावधीनंतर सकाळी 11 वाजता आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले; परंतु त्यानंतरही दुकानच्या दुसर्‍या व तिसर्‍या मजल्यावर आगीचा धुमसत असलेला धूर अग्निशमन दल आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते.

Advertisements
Ad 23

हे देखील वाचा: कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी भारत मोरे यांची निवड: सामाजिक कार्याचा गौरव

 वर्‍हाडी मेडिकलचे नुकसान
अष्टविनायक कलेक्शन रेडीमेड दुकानाला लागलेल्या आगीच्या उष्णतेची झळ शेजारी असलेल्या सुरेश सहदेव वर्‍हाडी यांच्या मालकीच्या वर्‍हाडी मेडिकलला बसली आहे. आगीत मेडिकलमधी एसी, एअर कर्टन, औषधे, संगणक, फर्निचर, फॅन आदींचे सुमारे 75 लाखांचे नुकसान झाले आहे. याशिवाय दुकानातील मेडिसिन वापरता येणार नाही असे दुकानचे मालक सुरेश वर्‍हाडी यांनी सांगितले.

Advertisements
Ad 24

व्यवसायात धवल चव्हाण दहा वर्षे मागे
अष्टविनायक कलेक्शन रेडीमेड कपड्याच्या दुकानातील रमजान ईद सणामुळे विक्रीसाठी खरेदी केलेल्या कपड्यांच्या गाठी व रेडीमेड कपडे आगीच्या भक्षस्थानी पडल्याने कापड दुकानची राख झाली. दुकानाला लागलेल्या आगीमुळे दुकान मालक धवल चव्हाण आपल्या व्यवसायात किमान दहा वर्ष मागे गेल्याची चर्चा व्यापारी करत होते.

Advertisements
Ad 25

 अग्निशमन बंबाची आवश्यकता
नारायणगावची वाढणारी बाजारपेठ व शहरीकरण विचारात घेता नारायणगाव ग्रामपंचायत ने स्वमालकीची अग्निशमन बंबाची उभारणी करण्याची आवश्यकता असल्याची जनमानसात चर्चा होऊ लागली आहे. ग्रामपंचायत ने ट्रॅक्टरच्या सहाय्याने उभी केलेली अग्निशमन यंत्रणा मोठ्या आगीच्या ठिकाणी कुचकामी असून मोठ्या अग्निशमन बंबाची आवश्यकता आहे. अनेक वेळा घटनास्थळी जुन्नर नगरपरिषदेचा अग्निशमन दलाचा बंब पोहोचेपर्यंत मोठा कालावधी लागत असल्याने आगीत मालमत्तेचे मोठे नुकसान होते; परंतु स्थानिक पातळीवर अग्निशमन बंब उपलब्ध झाल्यास मोठे नुकसान टाळता येऊ शकेल.

Advertisements

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Tags: Aashtavinayak Collection fireagni dhandhaagni safety solutionsagnishaman yathrabusiness fire damagefire accidentfire damage in businessfire safetykapad dukaan fireKapad shop fire Punelocal fire disasterlocal news puneNarangaon agnishamanNarangaon fireNarangaon fire incidentNarangaon kapad dukaanNarangaon market firePune commercial firePune district newspune firepune newsshort circuit firesuraj medicalsuraj varhadi
Previous Post

कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी भारत मोरे यांची निवड: सामाजिक कार्याचा गौरव

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मरगळ; जुन्नर तालुक्यातील स्थिती व कार्यकर्त्यांची मागणी

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मरगळ; जुन्नर तालुक्यातील स्थिती व कार्यकर्त्यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मरगळ; जुन्नर तालुक्यातील स्थिती व कार्यकर्त्यांची मागणी

ताज्या बातम्या

Daily Horoscope Today Marathi

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य 13 फेब्रुवारी 2026 : कोणासाठी लाभ, कोणासाठी संयम?

फेब्रुवारी 13, 2026
Daily Horoscope Today Marathi

Today’s Horoscope : आज गुरुवारी कोणाचे नशीब उजळणार? पाहा सविस्तर आजचे राशीभविष्य

फेब्रुवारी 12, 2026
Baner Shivajinagar Flyover Update Pune

Baner Shivajinagar Flyover Update : ट्रॅफिकमधून मोठी सुटका! बाणेर रॅम्प ‘या’ आठवड्यात सुरू

फेब्रुवारी 11, 2026
Daily Horoscope Today Marathi

Daily Horoscope: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा? जाणून घ्या 12 राशींचे सविस्तर भविष्य

फेब्रुवारी 11, 2026
Baravi Exam 2026 Maharashtra

Baravi Exam 2026: बारावीची परीक्षा आजपासून; 271 भरारी पथके तैनात

फेब्रुवारी 10, 2026
Pune Election Results Indapur NCP Victory

Pune Election Results: इंदापुरात राष्ट्रवादीचा इतिहास; भाजप पूर्णपणे पराभूत

फेब्रुवारी 10, 2026

कॅटेगरीज

  • आंबेगाव
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिडा
  • जुन्नर
  • टेक्नॉलॉजी
  • ताज्या बातम्या
  • देश
  • निधन वार्ता
  • नोकरी
  • पश्चिम महाराष्ट्र
  • पुणे
  • बारामती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • योजना
  • राजकीय
  • राशीभविष्य
  • शिरूर
Shivner Times News

मुख्य संपादक: प्रज्योत फुलसुंदर

+918698243535 / +919890118336
shivnertimesnews@gmail.com
info@shivnertimesnews.in

Shivner Times News
Pimpalwandi, Tal- Junnar, Dist- Pune 412412
3/6, Balewadi Rd, F-7, Sanskruti Homes CHS, near mamata chowk, Pune, Maharashtra 411045

Shivner Times News मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'Shivner Times News कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास Shivner Times News जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. " Shivner Times News " वर प्रसिद्ध झालेल्या बातम्या माध्यम प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून मिळणा-या व विविध स्त्रोतांद्वारे मिळणा-या माहितीवरून प्रसिद्ध केल्या जातात. (न्यायालयीन कामकाज जुन्नर न्यायकक्षेत.)

ट्रेंडिंग टॅग्स

Accident News ajit pawar Alephata bjp cricket news Crime News Daily Horoscope Devendra Fadnavis eknath shinde HMPV Virus junnar Junnar News Junnar taluka leapod news maharashtra Maharashtra crime news Maharashtra government Maharashtra news maharashtra police Maharashtra Politics Marathi News narayangaon Narayangaon news NCP Police Investigation political news prevent HMPV pune Pune crime pune crime news Pune District Pune district news Pune health news pune news Pune Police Shivaji Maharaj Shivneri Fort shocking incident sticky news women empowerment आजचे राशीभविष्य जुन्नर पुणे पुणे जिल्हा महाराष्ट्र
  • ABOUT US
  • CONTACT US
  • PRIVACY POLICY
  • Ownership & Funding Info
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal

© 2024. Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • आंबेगाव
    • जुन्नर
    • बारामती
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • योजना
    • नोकरी

© 2024. Powered by ContentOcean Infotech Private Limited.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा