लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण
पुणे: राज्यातील महायुती सरकारने माजी लाडकी बहीण योजनेतून महिलांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं. सत्तेत आल्यानंतर 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देण्याचं वचन सरकारने दिलं होतं. मात्र, अद्याप प्रत्येक महिन्याला फक्त 1500 रुपयेच खात्यात जमा होत असल्याने महिलांमध्ये नाराजी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितलं की, “लाडक्या बहिणीसाठी निधी कमी पडणार नाही. 2100 रुपयांबाबत काम सुरू आहे. बजेटचा समतोल राखत घोषणाही पूर्ण केली जाईल.”
आर्थिक शिस्त आणि शाश्वत योजना: मुख्यमंत्र्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “योजना शाश्वत पद्धतीने चालवायची असल्यास आर्थिक शिस्त पाळावी लागते. लाडक्या बहिणींसाठी निधी कमी पडणार नाही, असं नियोजन सरकारकडून केलं जात आहे. याशिवाय, महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी या योजनेतून सोसायट्या स्थापन करण्याचं नियोजन आहे.”
हे देखील वाचा: कांद्याची आवक वाढल्याने मंचर बाजार समितीत भाव झाले कमी
महिलादिनानिमित्त आश्वासन: जागतिक महिलादिनानिमित्त सरकारने फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकत्र जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, फक्त फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा झाल्यानंतर महिलांमध्ये निराशा पसरली आहे. आता मार्चचा हप्ता कधी जमा होईल, याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.
विरोधकांची टीका: महायुती सरकारच्या या घोषणांवर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. “2100 रुपयांचं आश्वासन केवळ निवडणुकीसाठी होतं का?” असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.












