जुन्नर:- जुन्नर पोलिसांनी नेतवड आणि नाणेघाट दरम्यान महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या 400 KV अतिउच्च दाबाची लाइनच्या अल्युमिनियमच्या तारांच्या चोरीप्रकरणी 05 आरोपींना अटक केली आहे आणि 6,50,000/- रुपयांचा माल जप्त केला आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या 400 KV बाभळेश्वर ते कुडूस दुहेरी परिपथ लाइनचे अल्युमिनियमचे तारे तोडून अज्ञात चोरांनी जवळपास 08 टन तारे चोरल्याने मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणी सुरेश नंदलाल प्रसाद (वय 53 वर्षे, एक्झिक्युटिव्ह जॉब, महाराष्ट्र स्टेट पॉवर ट्रान्समिशन, कल्पतरु प्रोजेक्ट इंटरनॅशनल लिमिटेड, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी जुन्नर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.
अल्युमिनियम तारा चोरीच्या घटना वाढल्याने पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी साध्या कपड्यात आणि सरकारी वाहनातून गस्त घालण्याचे आदेश दिले होते. पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या निर्देशानुसार सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चाकण आणि आळंदी येथील आरोपींची नावे पुढे आली. आरोपींची नावे अशी आहेत: 1. अविनाश लक्ष्मण कोळेकर, रा. हनुमानवाडी, चाकण आळंदी रोड, ता. खेड, जि. पुणे, 2. माधव रोहिदास गिते, रा. बंगला वस्ती, चाकण, ता. खेड, जि. पुणे, 3. आकाश श्रीराम आढे, रा. बंगला वस्ती, चाकण, ता. खेड, जि. पुणे, 4. शिवशंकर मारुती हळदेकर, रा. बंगला वस्ती, चाकण, ता. खेड, जि. पुणे, 5. चंद्रशेखर लौदुराम हरिजन, रा. गवतवस्ती, आळंदी फाटा, ता. खेड, जि. पुणे.
पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. 05/12/2024 रोजी त्यांना अटक करण्यात आली. या आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली अशोक लेलँड कंपनीची टेम्पो (MH 14 GU 0968) आणि बजाज कंपनीची पल्सर NS 125 CC (MH 14 LR 9947) जप्त करण्यात आली. तसेच, अंदाजे 02 टन वजनाच्या अल्युमिनियमच्या तारांसह 6,50,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख (पुणे ग्रामीण), अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे (पुणे ग्रामीण), उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण अवचर ,पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे, पोलीस उपनिरीक्षक रुशिकेश तिटमे, पो.ना सागर हिले, पो.कॉ दादा पावडे, पो.कॉ गणेश शिंदे यांनी केली आहे.
गुन्ह्याच्या तांत्रिक विश्लेषणासाठी पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक उमेश तावस्कर, पो. हा सुनिल कांळी, पो. कॉ. चेतन पाटील यांनी बहुमोल सहकार्य केले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे आणि पो.कॉ गणेश शिंदे करीत आहेत.












