भारतीय टपाल विभागात 25,000 पदांसाठी बंपर भरती: अर्ज कसा करावा, जाणून घ्या!
भारतीय टपाल विभागाने 25,000 ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांना भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी मिळू शकते. ही भरती ऑनलाइन पद्धतीने होईल, आणि अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ व सोपी आहे.
महत्वाची माहिती
भारतीय टपाल विभागाने जाहीर केलेली भरती एकूण 25,000 पदांसाठी आहे, ज्यामध्ये ग्रामीण डाक सेवक पदांचा समावेश आहे. अर्जाची प्रक्रिया 3 मार्च 2025 पासून सुरू होईल आणि उमेदवार 28 मार्च 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी दहावी पास (गणित आणि इंग्रजी या विषयांसह) मान्यताप्राप्त बोर्डातून उत्तीर्ण असावा. तसेच, उमेदवारांकडे संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा बेसिक संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्ष दरम्यान असावे.
- एससी/एसटी उमेदवारांना 5 वर्षांची सूट
- ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सूट
- दिव्यांग उमेदवारांसाठी 10 वर्षांची सूट
अर्ज शुल्क
- सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी ₹100
- एससी/एसटी/महिला/दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही
पगार
निवडलेल्या उमेदवारांना ₹10,000 प्रती महिना पगार दिला जाईल. अनुभवावर आधारित पगारात वाढ होऊ शकते आणि अतिरिक्त भत्ते दिले जातील.
हे देखील वाचा: मुंबईत अंगणवाडी सेविका पदांसाठी ३० रिक्त जागा – अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी २०२५
अर्ज कसा करावा?
- अधिकृत वेबसाइटवर जा
सर्वप्रथम, indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा. - नवीन नोंदणी करा
वेबसाइटवर पोहोचल्यानंतर, “नवीन नोंदणी”वर क्लिक करा आणि आवश्यक वैयक्तिक माहिती भरा. - लॉगिन करा
नोंदणी केल्यानंतर, ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा. - शैक्षणिक माहिती भरा
शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक तपशील भरा. - कागदपत्रे अपलोड करा
अर्जासंबंधी आवश्यक कागदपत्रे (दहावीचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र इ.) अपलोड करा. - अर्ज शुल्क भरा
अर्ज शुल्क भरताना कार्ड, नेट बँकिंग किंवा इतर पेमेंट मोड वापरा. - अर्ज तपासा आणि सबमिट करा
सर्व तपशील तपासून अर्ज सबमिट करा. - अर्जाचा प्रिंटआउट घ्या
अर्ज सबमिट केल्यानंतर त्याचा प्रिंटआउट सुरक्षित ठेवा.
महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 03 मार्च 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट
indiapostgdsonline.gov.in
अर्ज करण्याआधी: अर्ज करतांना संबंधित भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि सर्व अटी व शर्तींचा विचार करूनच अर्ज करा.
भारतीय टपाल विभागाच्या या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करा आणि आपले भविष्य उज्जवल करा.













