HSRP नंबर प्लेटच्या दरांबाबत सरकारकडून दिशाभूल? दुचाकीस्वारांसाठी तब्बल 678.50 रुपयांचा भुर्दंड
पुणे: सध्या HSRP (High-Security Registration Plate) नंबर प्लेटसाठी आकारल्या जाणाऱ्या दरांबाबत मोठ्या प्रमाणावर उलटसुलट चर्चा होत आहे. राज्य परिवहन विभागाने या दरांबाबत अधिकृत खुलासा केला असला तरी तो अधिक तपासणीच्या बादले दिशाभूल करणारा असल्याचं समोर आलं आहे. दुचाकीसाठी HSRP नंबर प्लेटसाठी ग्राहकांना प्रत्यक्षात तब्बल 678.50 रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे, असे वास्तव आता उघड झाले आहे.
दुचाकीस्वारांसाठी कशा प्रकारे वाढला खर्च? HSRP नंबर प्लेटच्या बेसिक दराबाबत सरकारने दिलेला आकडा 450 रुपये इतका आहे. मात्र, या दरावर 18% जीएसटी लागू झाल्यानंतर तो 531 रुपये होतो. त्याशिवाय, होम डिलिव्हरीसाठी अतिरिक्त 125 रुपये आकारले जातात. यामुळे हा खर्च 656 रुपये इतका होतो.
पण, खरी समस्या येते जिथे फिटमेंट चार्जेस आणि डिलिव्हरी चार्जेस एकत्र करून पुन्हा 18% जीएसटी लावला जातो. यामुळे एकत्रित रक्कम 678.50 रुपये इतकी वाढते. हा आकडा ग्राहकांच्या अपेक्षेपेक्षा खूपच जास्त असल्यामुळे सामान्य दुचाकीस्वारांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
हे देखील वाचा: मानपानासाठी ‘मयूर कलेक्शन’ ठरतंय पसंतीचं ठिकाण
ग्राहकांची दिशाभूल का होते? परिवहन विभागाच्या खुलाशात जीएसटी वगळून 450 रुपयांचे दर असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष व्यवहारात ग्राहकांना 678.50 रुपये मोजावे लागत असल्यामुळे हा खुलासा दिशाभूल करणारा ठरतो आहे.
यामुळे केवळ दुचाकीस्वारच नव्हे तर सर्वसामान्य ग्राहक वर्ग नाराजी व्यक्त करत आहे. सरकारने संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट आणि पारदर्शक करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
HSRP नंबर प्लेट: मागणी व अंमलबजावणी HSRP नंबर प्लेट लावण्याचे काम 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. दुचाकी, तीन चाकी, चार चाकी आणि जड वाहनांसाठी या प्लेट्सची अंमलबजावणी केली जात आहे. या नंबर प्लेट्सचे उद्दिष्ट वाहन चोरी कमी करणे आणि नियमबाह्य व्यवहार रोखणे आहे.
ग्राहकांची मागणी आणि संतापाचा सूर सध्या ग्राहकांकडून या वाढलेल्या दरांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून शासनाच्या दर जाहीर केल्यातील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. “सरकारने दर सुस्पष्टपणे समजावून सांगावेत आणि ग्राहकांवरील आर्थिक भार कमी करावा,” अशी मागणी नागरिक करत आहेत.











