जखमी तरसाला वन विभागाने वाचवले, नवजीवन मिळाले; धोलवडच्या भवानीनगर येथे वन विभागाचे यशस्वी बचावकार्य
जुन्नर: वन विभागाने जुन्नर तालुक्यातील धोलवडच्या भवानीनगर येथे एका उसाच्या शेतात आढळलेल्या जखमी तरसाला जीवनदान दिले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,
विशाल सोनवणे यांनी वन विभागाला फोनवर माहिती दिली की, धोलवडच्या विलास लक्ष्मण नलावडे यांच्या उसाच्या शेतात एक जखमी तरस पडलेला आहे. वनपाल सारिका बुट्टे (ओतूर), वनरक्षक विश्वनाथ बेले (ओतूर), वनरक्षक दादाभाऊ साबळे (उदापूर),
हे देखील वाचा: जखमी तरसाला वन विभागाने वाचवले, नवजीवन मिळाले; धोलवडच्या भवानीनगर येथे वन विभागाचे यशस्वी बचावकार्य
वनरक्षक कैलास भालेराव आळे, किसन केदार, गंगाराम जाधव, गणपत केदार, फूलचंद खंडागळे यांच्यासोबत घटनास्थळी भेट देऊन घटनेची पुष्टी केली. यानंतर ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनाही सूचना दिली गेली आणि तेही घटनास्थळी दाखल झाले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ दाखल होताच, सर्व वन कर्मचारी, आले बचाव पथक आणि स्थानिकांनी जाळे, दोर आणि पिंजऱ्यांच्या सहाय्याने जखमी तरसाला योग्य पद्धतीने वाचवले आणि सुरक्षितरित्या माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलवले. आणि पुढील उपचार सुरू आहेत. संबंधित तरसाची वय साधारण ६ ते ७ वर्ष आहे.












