वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी दोन मुलांमध्ये तुफान राडा! थोरल्या भावाने सुचवला धक्कादायक पर्याय…
मध्य प्रदेश: पित्याच्या अंत्यसंस्कारावरून दोन सख्ख्या भावांमध्ये तुफान वाद झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांचा मृतदेह समोर असताना दोघेही भांडत राहिले, त्यामुळे तब्बल पाच तासांपर्यंत अंत्यसंस्कार रखडले. या घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाले.
काय घडले नेमके?
ही घटना मध्य प्रदेशातील टीकमगड जिल्ह्यातील जटारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामपंचायत ताल लिधौरा येथे घडली. 85 वर्षीय ध्यानी सिंह घोष यांचे निधन झाले. त्यांचा धाकटा मुलगा दामोदर सिंह याने आयुष्यभर वडिलांची सेवा केली होती. वडिलांचा मृत्यूही त्याच्याच घरी झाला. त्यामुळे वडिलांच्या अंत्यसंस्काराचा अधिकार आपलाच असल्याचा त्याचा दावा होता.
मात्र, वडिलांचा मोठा मुलगा आपल्या कुटुंबासह तेथे पोहोचला आणि त्याने अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार आपलाच असल्याचे ठासून सांगितले. “मी मोठा मुलगा आहे, त्यामुळे वडिलांना अंतिम निरोप देण्याचा हक्क माझा आहे,” असे तो म्हणाला. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
हे देखील वाचा: डिंगोरे परिसरात वनगायींचा धुमाकूळ – शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान
थोरल्या भावाचा धक्कादायक प्रस्ताव!
वाद एवढा वाढला की मोठ्या भावाने मृतदेहाचे दोन तुकडे करण्याचा सुचवला. “एक काम कर, मृतदेहाचे दोन भाग करा आणि प्रत्येकी एक भागावर अंत्यसंस्कार करूया,” असे तो म्हणाला. हा प्रस्ताव ऐकून उपस्थित ग्रामस्थ आणि नातेवाईक सुन्न झाले.
दरम्यान, तब्बल पाच तास मृतदेह तसाच पडून होता. शेवटी गावकऱ्यांनी हस्तक्षेप करत दोन्ही भावांना समजावले आणि वडिलांचा अंत्यसंस्कार पार पडला.
कौटुंबिक कलहाने घेतला विदारक वळण
या घटनेवरून कुटुंबांमध्ये असलेल्या मालमत्तेच्या वादामुळे किती तीव्र तणाव निर्माण होऊ शकतो, हे स्पष्ट होते. ज्यांनी आयुष्यभर पालकांची सेवा केली, त्यांना अंतिम विधी करण्याचा अधिकार आहे का? की केवळ वंशपरंपरेनुसार मोठ्या मुलालाच हा हक्क आहे? असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे.












