गड-किल्ल्यांना अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय!
मुंबई: महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी कठोर निर्णय घेत विशेष समितीची स्थापना केली आहे.
गड-किल्ल्यांना अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल
- प्रत्येक किल्ल्यावरील अतिक्रमणाची माहिती ३१ जानेवारीपर्यंत गोळा केली जाणार.
- जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत.
- १ फेब्रुवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत टप्प्याटप्प्याने अतिक्रमण हटवले जाणार.
- भविष्यात अतिक्रमण होऊ नये म्हणून सतर्कता समिती नेमण्यात येणार.
किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सरकारचे ठोस पाऊल!
राज्यात अनेक किल्ल्यांच्या परिसरात गैरवापर आणि अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी राज्य सरकार आता कठोर पावले उचलत आहे.
हे देखील वाचा: चाकणमध्ये भरदिवसा गोळीबार; स्टील कंपनीच्या मालकावर भरदिवसा प्राणघातक हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, ३१ मे २०२५ पर्यंत सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त झाले पाहिजेत.
महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन आणि अतिक्रमण हटवण्यासाठी सरकार आता निर्णायक पावले उचलत आहे. या निर्णयामुळे गड-किल्ल्यांचे संरक्षण होणार असून, ऐतिहासिक वारसा अबाधित राहील.












