कुरवलीत माती दिनानिमित्त डॉ. मेटकरी – खरात यांचे मार्गदर्शन; मातीच्या नमुनांची तपासणी आणि आरोग्य विषयक महत्वपूर्ण माहिती
फलटण– श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण, कुरावली बु. अंतर्गत ग्रामीण उद्यानिकी कार्य अनुभव कार्यक्रमाच्या अंतर्गत माती आणि जल परीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शेतकऱ्यांसाठी माती आणि पाण्याची तपासणी काळाची गरज बनली आहे. माती आणि जल परीक्षण विशेषज्ञ डॉ. प्राजक्ता मेटकरी-खरात यांनी व्यक्त केले.
तसेच शेतकऱ्यांना माती आरोग्य संबंधित पत्रिकांचे वाटण्यात आले आणि त्यांचा विश्लेषण करण्यात आला. डॉ. मेटकरी-खरात यांनी मातीच्या आरोग्याबद्दल माहिती दिली आणि परीक्षणासाठी मातीचे नमुने कसे घ्यावे हे दाखवले. कृषि सहायक वैभव निंबाळकर यांनी देखील माती परीक्षणाचे महत्त्व सांगितले.
हे देखील वाचा: पुण्यात मद्यधुंद डंपर चालकाने 9 जणांना चिरडले
या कार्यक्रमात ग्रामच्या सरपंच सौ.राणी सूळ, कृषि सहायक श्री वैभव निंबाळकर आणि इतर ग्राम पंचायत कर्मचारी, ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते.
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर अणि कार्यक्रम अधिकारी डॉ. जे. व्ही.लेंभे व डॉ.ए.आर.पाटील आणि कार्यक्रम समन्वयक प्रा.ए.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, उद्यानदूत तिवाटणे आदित्य, सणस सचिन, भुजबळ विघ्नेश, टिळे संकेत, राऊत समीर, शिंदे कुणाल, साबळे सौरभ यांनी कार्यक्रमाचे यशस्वी संचालन केले.












