फुले एज्युकेशन तर्फे महिला शिक्षक दिन सुरू केल्याबद्दल तेलंगणा राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मानित
हैद्राबाद: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या वर्षीपासून तेलंगणा राज्यात महिला शिक्षक दिन सुरू करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले यांनी देशात महिलांना शिक्षण सुरू करीत सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अलौकिक असे महान कार्य केले. त्या कार्याचा वसा वारसा पुढील पिढीला प्रेरणादायी मिळत राहो म्हणून त्यांचा जन्मदिवस, ३ जानेवारी, हा भारतात प्रथम तेलंगाणा राज्याने ३ जानेवारी २०२५ पासून सर्वत्र लागू करून शासकीय निर्णय काढून सर्व ठिकाणी महिला शिक्षक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा केला.
राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. रेवंत रेड्डी यांना भेटीचे वेळ मागितली होती, परंतु विधान परिषद निवडणूक कामामुळे अचानक मीटिंगला गेल्याने आमच्या राज्याचे प्रमुख प्रतिनिधी व फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने महात्मा फुले प्रजा भवन, हैद्राबाद येथे, दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी स. ११ वाजता तेलंगणा राज्याचे उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमारका मालू यांना महात्मा फुले पगडी, उपरणे आणि विविध पुस्तकं देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले यांचे वारस डॉ. दिलीप नेवसे, अखिल भा. माळी महासंघाचे अध्यक्ष विलास पाटील, कार्याध्यक्ष शिवदास महाजन, तेलंगणा राज्याचे प्रा. सुकुमार पेटकूले, महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समितीचे सत्यशोधक रघुनाथ ढोक, गुजरातचे डॉ. शामराव फुले आणि मध्यप्रदेशचे कैलास वाघेला यांनी सन्मानित केले.
हे देखील वाचा: राजगुरूनगर: मामाच्या मुलाचा चालत्या बसमध्ये निर्घृण खून; भाच्याला जन्मठेपेसह एक लाख रुपये दंड
प्रगती भवनचे नाव महात्मा फुले प्रजा भवन दिल्याबद्दल सर्व प्रतिनिधींनी सरकारचे अभिनंदन केले. शालेय शिक्षण पद्धतीमधे फुले दाम्पत्यांचे जीवन, कविता आणि इतर महापुरुषांचे धडे असावेत अशी मागणी करण्यात आली. ऑफिसमधे जास्त प्रतिनिधींना भेट देऊ शकत नसल्याने उपमुख्यमंत्री यांनी सर्वांना बाहेर येऊन भेट दिली आणि सन्मानाचा स्वीकार केला. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. सुकुमार पेटकूले, सौ. विनोदां नगोसे, मुरलीधर नगोसे, सतीश गुरूनुले, शभाना शेंडे, नारायण गुरुनुले, गणेश माळी, विनोद गुरुनुले आणि कृष्णा भेंडारे यांनी केले.











