पहिल्या खो-खो विश्वचषकात भारताचा विक्रमी विजय; भारतीय महिला टीमने बीडच्या प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखाली साधला मोठा पराक्रम
दिल्ली: पहिल्या खो-खो विश्वचषकात भारताने जबरदस्त कामगिरी करत आपलं नाव उजळवलं आहे. पहिल्या खो-खो विश्वचषकातील महिला गटाचा अंतिम सामना १९ जानेवारीला दिल्लीमध्ये खेळला गेला. अंतिम सामन्यात भारत आणि नेपाळ या दोन देशांच्या संघांचा सामना झाला. या सामन्यात बीडच्या प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला खो-खो संघाने नेपाळला ३८ गुणांच्या फरकाने मात देत विश्वविजेतेपद मिळवलं.
भारतीय महिला खो-खो संघाने पहिल्या सामन्यापासूनच जबरदस्त कामगिरी करत संपूर्ण स्पर्धेत आपलं वर्चस्व राखलं. पहिल्या सामन्यात महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला १७६ धावांनी हरवलं. अंतिम सामन्यात भारताला नेपाळच्या आव्हानाचं सामनं करावं लागलं. पण भारताने हे आव्हान पार करत भारतीय महिला संघाने पहिला खो-खो विश्वचषक जिकून इतिहास रचला.
हे देखील वाचा: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; हॉल तिकीट सोमवारपासून ऑनलाइन
अंतिम सामन्यात भारतीय महिला संघ पहिल्या टप्यावर पुढे होता. त्या वेळी नेपाळी संघ ३४-० पेक्षा मागे होता. त्यानंतर नेपाळी महिला खेळाडूंनी दडपण आणून ३५-२४ एवढा स्कोर केला. दुसऱ्या टप्यात काही काळापर्यंत नेपाळी संघाचे वर्चस्व होते पण तिसऱ्या टप्यात ते मागे आले. भारतीय महिलांनी पुनः पुढे करत ३८ गुण आणि मिळवले.
चौथ्या टप्यात नेपाळने हल्ला सुरू केला. पण भारताने त्यांना थारा दिला नाही. भारतीय संघाने नेपाळच्या महिला संघाला ७८-४० या फरकाने हरवून पहिला खो-खो विश्वचषक जिंकला.
सामन्याचे पुरस्कार:
सर्वोत्तम आक्रमक: अंशू कुमारी (भारतीय संघ)
सर्वोत्तम संरक्षक : मनमती धानी (नेपाळ संघ)
सामन्याची सर्वोत्कृष्ट खेळाडू: चैतरा बी (भारतीय संघ)
हा विजय केवळ आमच्या संघाचा नव्हे, तर प्रत्येक भारतीय महिलेच्या स्वप्नांचा विजय आहे. या विश्वचषकासाठी आम्ही महिनोंमहिने कष्ट घेतले, प्रत्येक खेळाडूने आपले १०० टक्के योगदान दिले, आणि आज त्या सर्व मेहनतीचं फळ मिळालं आहे. हा महिलांच्या प्रगतीचा आणि देशाच्या गौरवाचा क्षण आहे. नेपाळसारख्या पहाडी प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळताना दबाव मोठा होता, पण आम्ही एक संघ म्हणून उभे राहिलो आणि प्रत्येक क्षणी एकमेकांना पाठिंबा दिला. आज आम्ही इतिहास रचला, पण ही फक्त सुरुवात आहे. भारतीय महिलांचा खेळ प्रत्येक आंतरराष्ट्रीय मंचावर चमकणार, याची खात्री आहे. हा विजय प्रत्येक भारतीयासाठी समर्पित आहे.”
– प्रियांका इंगळे, भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार










