छत्रपती संभाजीराजांचे बलिदान झाले, तो स्तंभ आजही अस्तित्वात
Shivner Times News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • आंबेगाव
    • जुन्नर
    • बारामती
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • योजना
    • नोकरी
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • आंबेगाव
    • जुन्नर
    • बारामती
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • योजना
    • नोकरी
No Result
View All Result
Shivner Times News
No Result
View All Result

छत्रपती संभाजीराजांचे बलिदान झाले, तो स्तंभ आजही अस्तित्वात

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाला राष्ट्रप्रेमी प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद; बलिदान स्थळाची माहिती

team shivner times by team shivner times
फेब्रुवारी 17, 2025
in ताज्या बातम्या, देश, पुणे, महाराष्ट्र
छत्रपती संभाजीराजांचे बलिदान झाले, तो स्तंभ आजही अस्तित्वात
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

छत्रपती संभाजीराजांचे बलिदान झाले, तो स्तंभ आजही अस्तित्वात

लोणी काळभोर: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhaava Chhatrapati Sambhaji Maharaj) जीवनावर आधारित छावा (Chhaava) चित्रपटाला राष्ट्रप्रेमी प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यातील प्रत्येक प्रसंग लोकांना भावतो आहे. शेवटच्या बलिदानाच्या प्रसंगी तर प्रेक्षक ढसढसा रडत आहेत. मात्र ज्या जागेवर संभाजी महाराजांचे बलिदान झाले, ती जागा आजही अनेकांना माहीत नाही.

Advertisements
Ad 22

पूर्वीचा बहादूरगड आणि आताचा धर्मवीरगड (Dharmveer Gadh) पुण्यापासून सुमारे १०० किलोमीटर (६२ मैल) अंतरावर आहे. जवळचे शहर दौंड आहे. हा किल्ला भीमा नदीच्या उत्तरेकडील दौंड शहराच्या पूर्वेस सुमारे १५ किलोमीटर (९.३ मैल) अंतरावर पेडगाव या गावात आहे.

Advertisements
Ad 21

छत्रपती संभाजी महाराजांना (Chhaava Chhatrapati Sambhaji Maharaj) संगमेश्वरला पकडल्यानंतर औरंगजेबाने अकलूजला असलेली छावणी पेडगावला आणली. हा भुईकोट किल्ला आहे. याच किल्ल्यात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान झाले. ज्या खांबाजवळ त्यांचे हौतात्म्य झाले तो खांब आजही या किल्ल्यात पाहण्यास मिळतो.

Advertisements
Ad 23

हे देखील वाचा: शिवजयंतीनिमित्त जुन्नरमध्ये शिवनेरी मॅरेथॉन १६ फेब्रुवारी रोजी

याच ठिकाणी मराठ्यांचा छावा असलेल्या संभाजी महाराजांनी औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याला धर्मवीर काय असतो, देशनिष्ठा आणि धर्मनिष्ठा काय असते, हे दाखवून दिले. याच किल्ल्यात त्यांच्यावर तब्बल २९ दिवसपर्यंत पराकोटीचे अत्याचार करण्यात आले. मात्र मराठ्यांचा छावा तरीही खंबीर राहिला आणि त्याने कुठलेही धर्मपरिवर्तन स्वीकारण्याऐवजी हौतात्म्य स्वीकारले. आता या गडाला धर्मवीरगड म्हणून ओळखले जाते. मात्र सध्या या किल्ल्याची दुरावस्था झालेली असून येथील अनेक वास्तू मोडकळीस आलेल्या आहेत.

Advertisements
Ad 24

गडाचा इतिहास: मुघल साम्राज्याच्या काळात पेडगाव हे मुघल सैन्याचे मुख्य ठिकाण होते. १६७२ मध्ये दख्खनेतील मुघल सेनापती बहादूर खान (औरंगजेबाचा दुधभाऊ) आणि त्याचा मामा याने येथे तळ ठोकला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा सैन्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. बहादूरखानाने या किल्ल्याचे नाव बहादूरगड असे ठेवले.

Advertisements
Ad 25

मोहिम: यानंतर त्याच्या विरुद्ध स्वराज्यात पेडगावची मोहिम आखली गेली आणि त्या मोहिमेचे प्रमुख सरदार होते स्वतंत्र स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते. त्यांच्या सोबत अनाजीपंत, मोरोपंत पिंगळे, येसाजी कंक, म्हाळोजी घोरपडे व त्यांचा मुलगा संताजी घोरपडे, धनाजी जाधव, बहिर्जी नाईक व त्यांचा साथीदार नंदी इ. यांचा समावेश होता. या मोहिमेचा खरा उद्देश होता बहादूर खानाने लुटून आणलेले हिंदू देव-देवता त्याच्याकडून परत आणायचे.

लुटलेले पेडगाव: या मोहिमेत सरसेनापतींनी ९,००० सेनेच्या दोन तुकड्या केल्या होत्या, त्यापैकी स्वतःसोबत २,००० सेना आणि बाकीची ७,००० सेना येसाजी कंक, म्हाळोजी घोरपडे आणि मोरोपंत पिंगळे यांना दिली होती. त्यांनी पेडगाव लुटायचा बेत आखला होता. त्यामुळे बहादूरगडच्या मुख्य दरवाजावर ७,००० सेना उभी करून बहादूरखानाची सेना आली तर उलट जंगलात पळायचे अशाप्रकारे हंबीररावांची पहिली मोहिम फत्ते झाली. आत औरंगजेबाचा दुमजली महाल आहे. १७५९ मध्ये पेडगाव हे सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी ताब्यात घेतले आणि ते १८१८ पर्यंत मराठ्यांकडे राहिले.

Advertisements

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Tags: ChhaavaChhatrapati Sambhaji MaharajDharmveer GadhHistorical MonumentsMarathi HistoryPedgaonSambhaji Maharaj SacrificeShivaji Maharaj
Previous Post

आयपीएलच्या थराराला २२ मार्चपासून होणार सुरुवात; कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना

Next Post

पुण्यात अपघाताचे सत्र सुरुच; भरधाव दुचाकीच्या धडकेत नागरिकाचा मृत्यू

Next Post
पुण्यात अपघाताचे सत्र सुरुच; भरधाव दुचाकीच्या धडकेत नागरिकाचा मृत्यू

पुण्यात अपघाताचे सत्र सुरुच; भरधाव दुचाकीच्या धडकेत नागरिकाचा मृत्यू

ताज्या बातम्या

Daily Horoscope Today Marathi

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य 13 फेब्रुवारी 2026 : कोणासाठी लाभ, कोणासाठी संयम?

फेब्रुवारी 13, 2026
Daily Horoscope Today Marathi

Today’s Horoscope : आज गुरुवारी कोणाचे नशीब उजळणार? पाहा सविस्तर आजचे राशीभविष्य

फेब्रुवारी 12, 2026
Baner Shivajinagar Flyover Update Pune

Baner Shivajinagar Flyover Update : ट्रॅफिकमधून मोठी सुटका! बाणेर रॅम्प ‘या’ आठवड्यात सुरू

फेब्रुवारी 11, 2026
Daily Horoscope Today Marathi

Daily Horoscope: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा? जाणून घ्या 12 राशींचे सविस्तर भविष्य

फेब्रुवारी 11, 2026
Baravi Exam 2026 Maharashtra

Baravi Exam 2026: बारावीची परीक्षा आजपासून; 271 भरारी पथके तैनात

फेब्रुवारी 10, 2026
Pune Election Results Indapur NCP Victory

Pune Election Results: इंदापुरात राष्ट्रवादीचा इतिहास; भाजप पूर्णपणे पराभूत

फेब्रुवारी 10, 2026

कॅटेगरीज

  • आंबेगाव
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिडा
  • जुन्नर
  • टेक्नॉलॉजी
  • ताज्या बातम्या
  • देश
  • निधन वार्ता
  • नोकरी
  • पश्चिम महाराष्ट्र
  • पुणे
  • बारामती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • योजना
  • राजकीय
  • राशीभविष्य
  • शिरूर
Shivner Times News

मुख्य संपादक: प्रज्योत फुलसुंदर

+918698243535 / +919890118336
shivnertimesnews@gmail.com
info@shivnertimesnews.in

Shivner Times News
Pimpalwandi, Tal- Junnar, Dist- Pune 412412
3/6, Balewadi Rd, F-7, Sanskruti Homes CHS, near mamata chowk, Pune, Maharashtra 411045

Shivner Times News मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'Shivner Times News कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास Shivner Times News जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. " Shivner Times News " वर प्रसिद्ध झालेल्या बातम्या माध्यम प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून मिळणा-या व विविध स्त्रोतांद्वारे मिळणा-या माहितीवरून प्रसिद्ध केल्या जातात. (न्यायालयीन कामकाज जुन्नर न्यायकक्षेत.)

ट्रेंडिंग टॅग्स

Accident News ajit pawar Alephata bjp cricket news Crime News Daily Horoscope Devendra Fadnavis eknath shinde HMPV Virus junnar Junnar News Junnar taluka leapod news maharashtra Maharashtra crime news Maharashtra government Maharashtra news maharashtra police Maharashtra Politics Marathi News narayangaon Narayangaon news NCP Police Investigation political news prevent HMPV pune Pune crime pune crime news Pune District Pune district news Pune health news pune news Pune Police Shivaji Maharaj Shivneri Fort shocking incident sticky news women empowerment आजचे राशीभविष्य जुन्नर पुणे पुणे जिल्हा महाराष्ट्र
  • ABOUT US
  • CONTACT US
  • PRIVACY POLICY
  • Ownership & Funding Info
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal

© 2024. Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • आंबेगाव
    • जुन्नर
    • बारामती
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • योजना
    • नोकरी

© 2024. Powered by ContentOcean Infotech Private Limited.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा