राजगुरूनगर: मामाच्या मुलाचा चालत्या बसमध्ये निर्घृण खून; भाच्याला जन्मठेपेसह एक लाख रुपये दंड
राजगुरूनगर: येथे सात वर्षांपूर्वी मामाच्या मुलीवर एकतर्फी प्रेमास विरोध होत असल्याने भाच्याने मामाच्या मुलाचा चालत्या बसमध्ये कोयत्याने निर्घुण खून केला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. आता या खटल्यात सत्र न्यायालयाने भाचाला आजन्म कारावास व एक लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
या घटनेत अॅड. सागर कोठारी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. सहायक अॅड. नारायण पंडित, अॅड. विनया जगनाडे यांनी या प्रकरणात एकूूण १६ साक्षीदार तपासले. पोलीस अंमलदार विजय चौधरी आणि खरात यांनी कोर्ट पैरवी म्हणून काम पाहिले. यानंतर हा निर्णय देण्यात आला आहे.
अजित भगवान कान्हुरकर (वय ४०, रा. दावडी) असे या आरोपीचे नाव आहे. राजगुरुनगरमधील दावडी येथे १२ जून २०१८ रोजी ही घटना घडली होती. श्रीनाथ खेसे असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. खेड येथील सत्र व जिल्हा न्यायाधीश एस.पी. पोळ यांनी हा निर्णय दिला आहे. याबाबत माहिती अशी की, अजित भगवान कान्हुरकर याचे मामाच्या मोठ्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते.
हे देखील वाचा: शिरुर प्रांत कार्यालयातील महिला अव्वल कारकूनाला लाच स्वीकारताना अटक; एक लाख साठ हजार रुपयांची लाच
त्याला मुलीचा व तिच्या कुटुंबियांचा विरोध होता. तो तिच्या कुटुंबाला त्रास देत होता. याबाबत पोलीस तक्रार केली होती. याचा अजितला राग होता, रागापोटी मामाचे खानदान संपवायचे या उद्देशाने पाळत ठेवून तो मामाचा मुलगा ज्या बसने शाळेत जातो, त्या बसमध्ये आधीच जाऊन बसला.
दरम्यान, श्रीनाथ खेसे सकाळी बसमध्ये बसला. दबा धरुन बसलेल्या अजितने बहिणीसमोरच श्रीनाथवर चालत्या बसमध्ये पाठीमागून सपासप डोक्यात कोयत्याने वार केले. यामध्ये श्रीनाथचा जागेवरच मृत्यु झाला होता. या घटनेने तेव्हा मोठी खळबळ उडाली होती. आरोपीने मारताना त्यांच्या डोक्याचा अक्षरशः भुगा केला होता.
यानंतर याबाबत तपास सुरू होता अखेर आज याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणी दोन पोलीस अधिकार्यांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणातील ओळख परेड पंचनामा ही गहाळ झाला होता, यामुळे प्रकरण तापले होते.










