आंबेगावमध्ये पिस्तूल बाळगल्याने पुणे पोलिसांनी केली कार्यवाही
पुणे: अवैध विक्रीसाठी पिस्तूल ठेवण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका महाविद्यालयीन युवकाला अटक केली आहे. या युवकाचे नाव आर्यन बापू बेलदारे (वय १९, रा. आईश्री विला अपार्टमेंट, आंबेगाव) असे आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका गोरे आणि तपास पथक आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत दत्तनगर परिसरात गस्त घालत होते.
हे देखील वाचा: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगचा शपथविधी सोहळा संपन्न
त्याच वेळी पोलीस कर्मचाऱ्यांना धनाजी धोत्रे आणि निलेश जामदाडे यांना माहिती मिळाली की आईश्री विला अपार्टमेंटच्या जवळील गोशाळेमध्ये एक व्यक्ती पिस्तूल घेऊन जात आहे. माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांची एक टीम तेथे गेली, त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या आर्यन बेलदारे यास ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे ४०,१०० रुपये किंमतीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे आढळून आली.
तो हे विक्रीसाठी ठेवत होता. हे काम वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका गोरे, पोलीस हवालदार शैलेन्द्र साठे, हनमंत मासाळ, निलेश जामदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, योगेश जगदाळे आणि विनायक पाडाले यांनी केले.











