चाकण-शिक्रापूर रोडवर कंटेनरने केलेली भीषण दुर्घटना; वेगवान कंटेनरची अनेक वाहनांना धडक; एकाचा मृत्यू
पुणे: शहरातील चाकण शिक्रापूर भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील चाकण-शिक्रापूर रोडवर एक वेगाने जाणाऱ्या कंटेनर ट्रकने अनेक वाहनांना धडक दिली. यात एक व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. तसेच अनेक जण जखमी झाल्याचेही समोर आले आहे. अपघातानंतर उपस्थित लोकांनी कंटेनर चालकाची चांगलीच धुलाई केली.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कंटेनरचा पाठलाग केला. आम्हाला मिळालेली माहिती अशी की, चाकणवरून शिकरपूरकडे जाणारा एक कंटेनर वेगाने पुढे जात होता. रस्त्यावर अनेक वाहने होती, परंतु त्या समोरून येणाऱ्या गाड्यांना धडक देत होत्या आणि पुढे जात होत्या. चाकण-शिक्रापूर रोडवर झालेल्या या थरारक अपघाताची माहिती तात्काळ उपस्थित लोकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कंटेनरचा पाठलाग केला. लोकांनी या पाठलागाच्या थरारक क्षणांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हे देखील वाचा: जामखेडजवळ बोलेरो अपघातात ४ जणांचा दु:खद अंत
पोलिस वाहन उडवले. समोर आलेल्या माहितीनुसार चाकण भागातील माणिक चौकात एक कंटेनर चालक वेगाने वाहन चालवून तीन महिलांना धडक मारण्याच्या प्रयत्नात होता. अचानक, जेव्हा त्याने पाहिले की पोलीस त्याचा पाठलाग करत आहेत, त्याने कंटेनरला पूर्ण वेगाने चालवण्यास सुरुवात केली आणि रस्त्यावर येणाऱ्या कारांना धडक दिली. त्याने समोर आलेल्या एक पोलीस वाहनालाही उडवून दिले.
या कंटेनरने चाकण भागातील एका मुलीला धडक दिली. तिचा पाय तिच्या शरीरापासून वेगळा झाला आहे. या अपघातात एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि दहा ते बारा लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.












