पुणे सोलापूर महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात; एकाचा दुर्दैवी मृत्यू; 20 जणांची प्रकृती गंभीर
दौंड: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे एक लक्झरी बस आणि ट्रकच्या दरम्यान अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे आणि 20 अन्य गंभीर जखमी झाले आहेत.
ही लक्झरी बस पुण्याकडे येत होती तेव्हा समोरून येणाऱ्या ट्रकने तिला धडक दिली आणि मोठा अपघात झाला. या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव अद्याप अज्ञात आहे. हा अपघात बुधवारी 25 तारखेला सकाळी 4 वाजता पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील खडकीजवळ विसवा हॉटेलसमोर झाला.
अपघात पहाटेच्या वेळी झाला आहे त्यामुळे सध्या या अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, लक्झरी बसने ट्रकला मागून धडक दिली. अपघात झाल्यानंतर भिगवण आणि स्थानिक नागरिक मदतीला धावून आले. भिगवण येथील केतन वाघ संघटनेची एम्बुलन्स तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना त्वरित भिगवणच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.












