ओतूरमध्ये कारच्या धडकेत बाईकस्वाराचा मृत्यू; एक गंभीर जखमी
ओतूर: ओतूरमध्ये कल्याण अहिल्यानगर हायवेवर झालेल्या अपघातात बाईकस्वाराचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना हॉटेल निमंत्रण समोर घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्याचे नाव प्रेम घोडेकर आहे.
कल्याण अहिल्यानगर हायवेवर ओतूरहून कल्याणकडे जाणाऱ्या दुचाकी वाहन आणि कल्याणहून ओतूरकडे येणाऱ्या कारची धडक झाली. या अपघातात बाईकस्वार प्रेम घोडेकर यांचा मृत्यू झाला.
हे देखील वाचा: मुंबईत ६ महिन्याचे बाळ HMPV संक्रमित; उपचार सुरू, पालकांना सतर्कतेचा इशारा
कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातात कार आणि दुचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सुरेश गेंगजे, संदीप भोते, शामसुंदर जायभाये घटनास्थळी दाखल झाले आणि रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास ओतूर पोलीस करत आहेत.













