कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी भारत मोरे यांची निवड: सामाजिक कार्याचा गौरव
कोल्हापूर: बहुजन भिम सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी कार्यरत असलेल्या आणि सामाजिक कार्याचा ठसा उमटवणाऱ्या मा. भारत मोरे यांची बहुजन पँथर सेनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
मा. भारत मोरे हे गोरगरीब नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करणारे, अन्याय-अत्याचाराविरुद्ध लढा देणारे, महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील आणि अपंग, विधवा तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणारे एक धाडसी व्यक्तिमत्त्व आहेत.
हे देखील वाचा: ‘द हंड्रेड’ स्पर्धेत पाकिस्तानच्या ५० पैकी एकाही खेळाडूला बोली नाही; क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा नाचक्की
संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा आदरणीय सौ. निशा ताई बचुटे मॅडम, राष्ट्रीय अध्यक्ष आब्रहम भोसले आणि राष्ट्रीय उपाध्यक्षा श्रीमती संगीता ताई कवाळे यांच्या संयुक्त विद्यमाने मा. भारत मोरे यांना कोल्हापूर जिल्हाध्यक्षपद बहाल करण्यात आले.
या निवडीबद्दल संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. प्रकाश खैरमोडे तसेच संघटनेतील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मा. भारत मोरे यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.











