मुंबईत ६ महिन्याचे बाळ HMPV संक्रमित; उपचार सुरू, पालकांना सतर्कतेचा इशारा
मुंबई: देशात एचएमपीव्ही व्हायरसने प्रवेश केला आहे. आता हा देशाच्या आर्थिक राजधानीत पोहोचला आहे. मुंबईत एचएमपीव्ही रुग्ण आढळला आहे.
मुंबईत एचएमपीव्हीचा एक रुग्ण आढळला आहे. ६ महिन्याचे बाळ या व्हायरसने संक्रमित झाले आहे. बाळाचे उपचार आयसीयूमध्ये सुरू आहेत.
HMPV ची लक्षणं
- सर्दी
- खोकला
- ताप
- घसा खवखवणे
- धाप लागणे
- जुलाब
- अंगावर पुरळ
हे देखील वाचा: HMPV व्हायरसचा धक्का राज्याला; नागपुरात दोन मुलं बाधित
या गोष्टींची काळजी घ्या…
- किमान २० सेकंद साबण आणि पाण्याने हात धुवा.
- जर साबण आणि पाणी उपलब्ध नसेल, तर अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझरचा वापर करा.
- श्वसन संबंधी लक्षण असलेल्या लोकांपासून दूर रहा.
- दरवाजाचे हँडल, फोन आणि काउंटरटॉप्स सारख्या वारंवार स्पर्श होणाऱ्या पृष्ठभागांची स्वच्छता ठेवा.














