अरविंद मेहता: ब्रिटीश काळात दर्पणकारांची भूमिका महत्वाची; इतिहासातील दर्पणकारांची तडफ आणि समर्पण
फलटण: आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी देशात असलेल्या ब्रिटीश राजवटीच्या काळात दि. ६ जानेवारी १८३२ रोजी देशातील पाहिले मराठी वृत्तपत्र “दर्पण” सुरु करुन त्यामधून परिणामांची तमा न बाळगता प्रसंगी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न राज सत्तेसमोर मांडण्याला प्राधान्य देत जनप्रबोधनही केल्याचे अरविंद मेहता यांनी निदर्शनास आणून दिले.
दर्पण पुरस्कार प्राप्त दै. पुण्यनगरीचे फलटण प्रतिनिधी यशवंत खलाटे पाटील व दै. गंधवार्ताचे संपादक ॲड. रोहित अहिवळे आणि अन्य पत्रकार यांच्या सत्कार प्रसंगी जैन सोशल ग्रुप अंतर्गत संगीनी फोरम आयोजित कार्यक्रमात अरविंद मेहता बोलत होते, यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मंगेश दोशी (गुणवरेकर), श्री चंद्रप्रभू मंदिर ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्रभई कोठारी (बुधकर), जैन सोशल ग्रुपचे उपाध्यक्ष श्रीपाल जैन, सचिव प्रीतम शहा (वडूजकर), संगिनी फोरम अध्यक्षा सौ. अपर्णा जैन व त्यांच्या सहकारी संगिनी पदाधिकारी,सदस्या
उपस्थित होत्या.
स्वातंत्र्य पूर्वकाळात येथील वृत्तपत्रांनी स्वातंत्र्य चळवळीला बळ देत तत्कालीन ब्रिटीश राजवटीविरुद्ध समाजमन तयार करण्याबरोबर चळवळीबाबत आवश्यक माहिती समाजापर्यंत पोहोचविण्यात महत्वाची भूमिका बजावली त्याप्रमाणे स्वातंत्र्यानंतर स्वराज्याचे सुराज्य करण्याच्या स्वकियांच्या प्रयत्नातही येथील वृत्तपत्रांनी आपली जबाबदारी निभावल्याचे अरविंद मेहता यांनी निदर्शनास आणून दिले.
अलीकडे सर्वच क्षेत्रात निर्माण झालेली स्पर्धा वृत्तपत्र क्षेत्रातही आली असली तरी आजही वृत्तपत्र समाजापासून दूर गेली नाहीत तथापि आता समाजानेही त्यांना आपले मानून बळ देण्याची गरज असल्याचे अरविंद मेहता यांनी निदर्शनास आणून दिले.
हे देखील वाचा: सैफ अली खानवर चाकूने हल्ला
संगीनी फोरमच्या अध्यक्षा सौ. अपर्णा जैन यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात आपल्या २ वर्षाच्या कार्यकाळात वृत्तपत्रांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आपण विविध उपक्रम राबवून समाजातील सर्व घटकांसाठी काम केले, संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हे काम पोहोचविताना वृत्तपत्रांचा मोठा आधार लाभल्याने अनेक पुरस्कार व शाबासकीची थाप मिळाल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.
यावेळी मुगुटराव कदम, अरविंद मेहता, यशवंत खलाटे पाटील, ॲड. रोहित अहिवळे, सुभाषराव भांबुरे, युवराज पवार, विनायक शिंदे यांचा पत्रकार दिनानिमित्त संगिनी फोरम कडून सत्कार करण्यात आला. मकर संक्रांति निमित्त सर्वांना तिळगुळ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
संगिनी फोरमच्या माजी अध्यक्षां सौ. नीना कोठारी, उपाध्यक्षा सौ. मनिषा व्होरा,सचिव सौ.प्रज्ञा दोशी, खजिनदार सौ.मनीषा घडिया, सहसचिव निता दोशी व बहुसंख्य संगिनी सदस्या उपस्थित होत्या.
सौ. नीना कोठारी यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.














