जुन्नर आणि ओतूर बाजार समितीत कांद्याची मोठी आवक – दरात मोठी घसरण!
पुणे: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार जुन्नर तसेच उपबाजार ओतूरमध्ये गुरुवारी (दि. २७) कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. मात्र, मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्याने कांदा दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
ओतूर उपबाजारातील कांदा दर (प्रति १० किलो):
- गोळा कांदा: ₹१७० – ₹२००
- सुपर कांदा: ₹१३० – ₹१८०
- गोल्टी/गोल्टा: ₹३० – ₹१४०
- बदला कांदा: ₹३० – ₹११०
- बटाटा: ८५१ पिशवी आवक, दर ₹२०० (प्रति १० किलो)
- लसूण: २ पिशवी आवक, दर ₹३०० – ₹५५१ (प्रति १० किलो)
- एकूण कांदा आवक: १३,८२१ पिशवी
हे देखील वाचा: नारायणगावातील अष्टविनायक कलेक्शन कापड दुकान शॉर्टसर्किटमुळे भस्मसात, दोन कोटींचं नुकसान
जुन्नर बाजारातील कांदा दर (प्रति १० किलो):
✔ नंबर १ (गोळा): ₹१७० – ₹१९०
✔ नंबर १ (सुपर कांदा): ₹१४० – ₹१७०
✔ नंबर २ (गोल्टा/गोलटी): ₹५० – ₹१४०
✔ नंबर ३ (बदला): ₹१०० – ₹१३०
बटाटा: ५६१ पिशवी आवक, दर ₹५० – ₹१७० (प्रति १० किलो)
लिलाव वेळ: गुरुवार व रविवार, सकाळी १० वाजता सुरू होतो.
कांदा दरात घसरणीची कारणे
- अधिक उत्पादनामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात आवक
- स्थानिक तसेच बाहेरील व्यापाऱ्यांकडून खरेदी कमी
- निर्यातीवरील निर्बंध आणि साठवणुकीची मर्यादा
शेतकऱ्यांचे मत – दर वाढले नाही तर मोठे आर्थिक नुकसान!
“सद्याच्या दराने आम्हाला उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे. मागील काही महिन्यांपासून कांद्याचे दर सातत्याने कमी होत आहेत, यामुळे आर्थिक अडचणी वाढत आहेत,” असे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले.
शेतकरी संघटनांकडून सरकारकडे कांदा हमीभाव निश्चित करावा, निर्यात धोरण सुधारावे आणि साठवणूक सुविधांसाठी मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे.












