श्री. जे. आर. गुंजाळ इंग्लिश मेडिअम स्कूलच्या ‘टीम निओ न्यूटनियन’चा ऐतिहासिक विजय
आळेफाटा: पुण्याच्या बालेवाडी येथे आयोजित First Tech Challenge India Championship 2025 मध्ये श्री. जे. आर. गुंजाळ इंग्लिश मेडिअम स्कूलने दिमाखदार विजय मिळवला आहे. या स्पर्धेत ‘टीम निओ न्यूटनियन’ने Judges Choice Award पटकवून जुन्नर तालुक्यातून या प्रकारच्या स्पर्धेतील पहिला विजय मिळवला.
विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम, शिक्षकांच्या मार्गदर्शन आणि शाळेच्या पाठिंब्यामुळे ही अभूतपूर्व कामगिरी साकारली गेली. अचूक नियोजन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत विद्यार्थ्यांनी तयार केलेला रोबोट सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या स्पर्धेत अमेरिका, श्रीलंका, बांगलादेश, साऊथ कोरिया, नेपाळ यांसारख्या विविध देशांतील स्पर्धकांनी भाग घेतला, तसेच गुजरात, पणजी, गोवा आणि राजस्थानच्या स्पर्धकांनी देखील उत्कृष्ट कामगिरी केली.
‘टीम निओ न्यूटनियन’ने या स्पर्धेत २४ विद्यार्थ्यांसोबत सहभाग घेतला, ज्यात श्रेयश देवकर, संस्कार शिंदे, प्रदूमण्य जाधव, नयन भुजबळ, वेद ढोकरे, वेदांत दांगट, वैभव मेढा, हर्षद भुजड, प्राची नवले, ऋचा पापळ, निरंका ठाकरे, आकांक्षा सात्वि, सोहम कुटे, आरव भुजबळ, आर्या पोटे, वैष्णवी हांडे, आराध्य हांडे, संकेत कदम, तन्वी फुलसुंदर, श्रुष्टि शिंगोटे, अदिती वांगड, सुप्रेम रिंझाडं, शाम भोणार, रुतिका बीज यांचा समावेश होता.
हे देखील वाचा: धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांना सुपूर्द, सागर बंगल्यावर पीए मार्फत
या विद्यार्थ्यांच्या मेहनतीला डॉ. श्रीकांत गुंजाळ आणि डॉ. सुयश गुंजाळ यांनी विशेष मार्गदर्शन केले. ओम चैतन्य फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रदीप गुंजाळ, सचिव मीना गुंजाळ आणि शाळेच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
या ऐतिहासिक विजयाने शाळेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे, आणि विद्यार्थ्यांच्या यशाने शाळेच्या प्रतिष्ठेत वाढ केली आहे.












