विराट कोहली बनला आशियातील नंबर 1 फलंदाज! जाणून घ्या आकडेवारी
Virat Kohli vs Sachin Tendulkar: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs ENG, 3rd ODIs) विराट कोहलीने (Virat Kohli Record) इतिहास रचला आहे. कोहली आशियातील मैदानांवर सर्वात जलद 16,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज बनला आहे. याबाबतीत त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले.
तेंडुलकरने आशियामध्ये 353 डावांमध्ये 16,000 आंतरराष्ट्रीय धावा केल्या. आता कोहलीने त्याच्या 340 व्या डावात ही कामगिरी केली आहे. याशिवाय, किंग कोहली आशियात सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज बनला आहे.
आशियामध्ये जलद 16000 धावा करणारे फलंदाज:
- 340 डाव: विराट कोहली
- 353 डाव: सचिन तेंडुलकर
- 360 डाव: कुमार संगकारा
- 401 डाव: महेला जयवर्धने
हे देखील वाचा: टीम इंडियाला मोठा झटका! प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर
आशियात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज:
- 21741: सचिन तेंडुलकर
- 18423: कुमार संगकारा
- 17386: महेला जयवर्धने
- 16000: विराट कोहली*
- 13757: सनथ जयसूर्या
- 13497: राहुल द्रविड
विराट कोहली बराच काळ फॉर्ममध्ये नव्हता, पण तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने शानदार फलंदाजी केली. कोहलीने एकदिवसीय सामन्यांमधील त्याचे 73 वे अर्धशतक झळकावले. 52 धावा काढल्यानंतर आदिल रशीदच्या गोलंदाजीवर कोहली बाद झाला. यष्टीरक्षकाकडे त्याचा झेल गेला.












