संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या, धक्कादायक घटनेने उडाली खळबळ…
पिंपरी चिंचवड: देहूत संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेत ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
शिरीष महाराज यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते. तसेच त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील होते.
हे देखील वाचा: श्री विघ्नहर साखर कारखान्यावरील आंदोलन तात्पुरते स्थगित, चेअरमन सत्यशील शेरकर यांचे आश्वासन
त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. नुकताच त्यांचा टिळा झाला होता. एप्रिल किंवा मे महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. आत्महत्येच्या घटनेमुळे देहूगावावर शोककळा पसरली आहे. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.












