आदिवासी गिर्यारोहक निखिल कोकाटे दक्षिण आफ्रिकेतील किलीमांजारो मोहिमेसाठी सज्ज!
पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील निखिल किसन कोकाटे हे आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारो (5,895 मीटर) सर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ते पुणे जिल्ह्यातील पहिले आदिवासी गिर्यारोहक ठरणार असून, सातही खंडांतील सर्वोच्च शिखरांवर चढाई करण्याचा त्यांचा संकल्प आहे.
ही मोहिम महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागाच्या पाठबळाने हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा उद्देश आदिवासी युवकांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण करणे, साहसी पर्यटनाद्वारे रोजगारनिर्मिती करणे आणि आदिवासी संस्कृतीला जागतिक स्तरावर पोहोचवणे हा आहे.
गिर्यारोहण क्षेत्रातील निखिल कोकाटे यांची वाटचाल
महत्त्वपूर्ण मोहिमा:
माउंट युनाम (6111 मीटर) – हिमाचल प्रदेश
माउंट ब्लॅक पीक (6387 मीटर) – उत्तराखंड
माउंट काब्रु साऊथ (7491 मीटर) – सिक्कीम (कॅम्प 1 पर्यंत)
हिमालयीन ट्रेक्स:
गोचेला पास ट्रेक (सिक्कीम)
काश्मीर ग्रेट लेक्स ट्रेक
बाली पास, हर की दून, केदारकंठा, ब्रह्मताल ट्रेक (उत्तराखंड)
हम्पटा पास, चंद्रखणी पास, बियास कुंड, भ्रिगु लेक ट्रेक (हिमाचल प्रदेश)
सह्याद्रीतील मोहिमा:
खडापार्शी (वानरलिंगी) शिखर – 450 फूट
लिंगाणा – 1000 फूट
कात्राबाई दरी उतरण (सह्याद्रीतील सर्वात खोल घळ)
विक्रम पिनॅकल आणि उधळ्या डोंगर लिंगी – पहिली चढाई
प्रशिक्षण आणि पात्रता:
बेसिक आणि अॅडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्स – हिमालयीन माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट, दार्जिलिंग
Wilderness First Responder – आपत्ती व्यवस्थापन आणि प्राथमिक उपचार प्रशिक्षण
साहसी पर्यटन प्रशिक्षक – महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयामध्ये कार्यरत
मोहिमेचे उद्दिष्ट आणि सामाजिक योगदान
आदिवासी युवकांसाठी प्रेरणादायी उदाहरण:
पुणे जिल्ह्यातील पहिला आदिवासी युवक जो सातही खंडांतील सर्वोच्च शिखरांवर चढाई करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
साहसी पर्यटनाद्वारे रोजगार निर्मिती:
गिर्यारोहण आणि साहसी पर्यटन क्षेत्रात स्थानिक आदिवासी युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे.
संस्कृतीचा जागतिक प्रचार:
आदिवासी जीवनशैली आणि संस्कृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा संकल्प.
विशेष आभार आणि पाठिंबा
प्रशासकीय दस्तऐवज पूर्ण केल्यावर पाठपुरावा व मंजुरी पर्यंतचे मोलाचे सहकार्य संसदरत्न खासदार डॉ. अमोलदादा कोल्हे साहेब यांचे लाभले. निखिल कोकाटे यांनी या मोहिमेसाठी विशेष सहकार्य करणाऱ्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव येथील प्रकल्प अधिकारी मा. प्रदीप देसाई सर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी मा. सोनुल कोतवाल आणि श्री. लिपिक माणिक चकवे यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे स्वीय सहाय्यक श्री. तुषारजी डोके यांनी या मोहिमेसाठी विशेष प्रयत्न केले.
मा. प्रदीप देसाई (प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव)
“निखिल कोकाटे यास किलीमांजारो मोहिमेसाठी हार्दिक शुभेच्छा. साहसी पर्यटनाद्वारे आदिवासी तरुणांसाठी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. स्थानिक आदिवासी संस्कृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याच्या या मोहिमेसाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू.”निखिल कोकाटे (गिर्यारोहक)
“किलीमांजारो शिखर सर करण्याचे माझे स्वप्न आता पूर्ण होत आहे. भविष्यात सातही खंडांतील सर्वोच्च शिखरांवर चढाई करण्याचा मानस आहे. आदिवासी विकास विभागाच्या पाठिंब्यामुळे ही मोहीम शक्य झाली. मी सर्व अधिकारी आणि सहकाऱ्यांचा आभारी आहे.”
भविष्यातील लक्ष्य – ‘Seven Summits’ मोहिम
सातही खंडांतील सर्वोच्च शिखरं:
माउंट एव्हरेस्ट (8848 मीटर) – आशिया
माउंट अकोंकागुआ (6962 मीटर) – दक्षिण अमेरिका
माउंट डेनाली (6190 मीटर) – उत्तर अमेरिका
माउंट एल्ब्रूस (5642 मीटर) – युरोप
विन्सन मासिफ (4892 मीटर) – अंटार्क्टिका
माउंट किलीमांजारो (5895 मीटर) – आफ्रिका












